मुख्य बातम्या

आम्ही कर्तव्य बजावत असतो परंतु आज कर्तव्य फाउंडेशन CCTV बसवून खरं कर्तव्य बजावले…

कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर बस स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे 

शिरूर (अरुणकुमार मोटे): पोलीस कर्मचारी समाजाचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून आम्ही कर्तव्य बजावत असतो परंतु खरं कर्तव्य हे आज “कर्तव्य फाउंडेशन” ने बजावले असून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या, युवतींच्या व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे व आदर्श कार्य कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून झाले असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर एस टी स्टँड येथे सी सी टी व्ही कॅमेरे लोकार्पण सोहळ्यात पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले. या लोकार्पण कार्यक्रमास शिक्रापूर नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, उपसरपंच पूजा भुजबळ, सारिका सासवडे, मोहिनी मांढरे, उषा राऊत, वंदना भुजबळ, शालन राऊत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

स्वारगेट येथील अत्याचाराच्या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यावर फक्त चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवत महिला दिनाच्या निमित्त आदर्श सरपंच रमेश गडदे व कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने शिक्रापूर बस स्थानकावर महिलांची, ज्येष्ठ नागरिकांची, सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थिनी यांची सुरक्षितता राहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सरपंच रमेश गडदे यांनी कर्तव्य फाउंडेशनच्या कामाची माहिती विशद केली आणि गौरी हिंगणे व पूजा भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष खैरे, कृष्णा सासवडे, शिरूर आगारप्रमुख मनीषा गायकवाड, लाठी काठी प्रशिक्षक तांबे सर, टोके सर, ॲड राजेश धुमाळ, भूमता ब्रिगेडच्या अध्यक्ष मंगल सासवडे, वनाधिकारी गौरी हिंगणे, विखारे ताई, शिक्रापूर समस्या व उपाय ग्रुपचे सर्व पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार निलेश जगताप यांनी केले तर कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा गडदे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago