Categories: इतर

शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार यांच्या गटाची सरशी..

अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणाच्या गटाचा होणार याबाबत उत्सुकता

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (दि. ९) मार्च रोजी 5 जागेसाठी निवडणूक झाली असून या पाचही जागेवर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बाजी मारली असून, खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत नक्की सत्ता कोणाची हे सिद्ध होणार आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांनी लक्ष घातल्याने पाचही जागेवर त्यांचे उमेदवार निवडून आले आहे.

वडगाव रासाई गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सुरेशराव ढवळे व शरद साठे यांच्यात काटे की टक्कर होऊन केवळ एकमताने ढवळे विजयी झाले आहे, तर मांडवगण फराटा गटामध्ये बाळासाहेब नागवडे एक मताने विजयी झाले आहे. शांततेत पार पडलेली ही निवडणूक ९ मार्च सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महायुती व महाविकास आघाडी दोन्हींच्या नेत्यांनी आपले उमेदवार निवडून येण्यासाठी सकाळपासूनच निवडणूक केंद्र शिरूर नगरपरिषद सेंटर शाळा येथे थांड मानले होते. मतदारांना नेण्यासाठी शिरूर तालुक्यातील सर्व भागातून उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था व खातेदारी केल्याचे दिसून येत होते. ही निवडणूक पहिल्या टप्प्यात 12 जागेवर बिनविरोध झाली होती. त्यात महायुतीने 10 जागेवर आपला हक्क सांगितला होता तर महाविकास आघाडीचे माजी आमदार अशोक पवार यांचे 2 उमेदवार बिनविरोध झाल्याचे बोलले जात होते.

आज झालेल्या निवडणुकीत पाचही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी पाचही जागेवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीनंतर माजी आमदार अशोक पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की बिनविरोध झालेल्यांपैकी अनेक जण यांनी माला विधानसभा निवडणुकीमध्ये सहकार्य केले होते ते माझे सहकारीच आहेत व आज निवडून आलेले पाचही उमेदवार माझ्याच पक्षाचे व महाविकास आघाडीचे आहे. हा विजय माझा नसून बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत असल्याचे माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

आज निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे

सोसायटी मतदार संघ अ वर्ग

मांडवगण फराटा गट; ळासाहेब अर्जुनराव नागवडे १४ मते विजयी

वडगाव रासाई गट; सुरेशचंद्र मारुतराव ढवळे ११ मते विजयी

टाकळी हाजी गट;  महेंद्र सुरेश पाचर्णे १९ मते विजयी, यांच्यामध्ये लढत होणार आहे. वैयक्तिक सभासद मतदारसंघ नवनाथ सुभाष ढमढेरे १११५ मते विजयी, सर्जेराव दसगुडे ११३१ मते विजयी.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे 

कारेगाव गट राहुल उर्फ किसनराव आनंदराव गवारे, न्हावरा गट नामदेव जयवंत गिरमकर, पाबळ गट लहू बाळासाहेब थोरात, रांजणगाव गणपती गट राजेंद्र उत्तम नरवडे, तळेगाव ढमढेरे गट गुलाब बबन सातपुते, शिक्रापूर गट बाळासाहेब माणिकराव टेमगिरे, धामारी गट कानिफनाथ दादाभाऊ भरणे,

अनुचित जाती-जमाती राखीव गट; विवेक उत्तमराव सोनवणे

महिला प्रतिनिधी;  मनीषा सुनील शेलार, सुजाता राजेंद्र नरवडे.

इतर मागासवर्गीय प्रतिनिधी; संभाजी काळुराम भुजबळ

भटक्या विमुक्त जाती; शरद वसंत कालेवार

या बारा जागेवर बिनविरोध निवड झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

3 मिनिटे ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

6 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

5 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

19 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

19 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

19 तास ago