मुख्य बातम्या

शिरुर विधानसभेचा भाजपाचा उमेदवार कोण?

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर विधानसभेच्या जागेची नेहमीच वेगवेगळी चर्चा होत असून अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीकडे सदर जागा राहिलेली असताना काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले असल्याने आता पुढील काळात शिरुर विधान सभेचा भारतीय जनता भारतीय उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरुर विधानसभा मतदार संघ अनेकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहिलेला असताना यापूर्वी माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे यांनी प्रतिनिधित्व केले असून सध्या अशोक पवार प्रतिनिधित्व करत आहे, तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जयश्री पलांडे यांनी निवडणूक लढवलेली असताना त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र त्यानंतर बाबुराव पाचर्णे यांनी देखील दोन वेळा विधानसभेची जागा भाजपाच्या ताब्यात आणली होती, तर मंगलदास बांदल यांनी एकदा भाजपा कडून उमेदवारी लढवली असून त्यांना अपयश आले होते.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झालेले असल्याने भाजपाकडे तुल्यबळ उमेदवार कोण असे बोलले जात असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद तसेच शिरुर तालुक्यात विविध आंदोलने यशस्वी केल्याने विविध आंदोलनाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या माध्यमातून आपला संपर्क सुरु ठेवून आपल्या उमेदवारीची तयारी सुरु ठेवलेली असताना यापूर्वी भाजपाकडून उमेदवारी लढवलेले भाजपाच्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या असलेल्या जयश्री पलांडे यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने त्या स्वगृही आलेल्या आहेत

तर यापूर्वी भाजपाकडून उमेदवारी लढवलेले जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल सध्या कोणत्याही पक्षात नसताना ते सर्व पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याने बांदल कोणत्या पक्षात असणार हे अद्याप देखील स्पष्ट नाही, मात्र राष्ट्रवादी कडून शिरुर विधानसभेसाठी आमदार अशोक पवार हे उमेदवार निच्छित असताना भारतीय जनता पार्टी कडून कोण निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना प्रदीप कंद, मंगलदास बांदल, जयश्री पलांडे व संजय पाचंगे यांच्यापैकी कोण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार अशी देखील चर्चा आता शिरुर तालुक्यात रंगू लागली आहे.

मंगलदास बांदल लोकसभेला कि विधानसभेला…

पुणे जिल्ह्यातील राजकारण बदलणारे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी यापूर्वी शिरुर लोकसभेची घोषणा केलेली असताना काही राजकीय घडामोडीमुळे त्यांनी राष्ट्रवादीला पाठींबा देऊन राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक आणून शिवसेनेला धक्का दिला होता तर त्यांनी यापूर्वी विधानसभेची उमेदवारी लढवलेली आहे, सध्या ते लोकसभा मतदार संघात जास्त लक्ष देत असल्याने यापुढे मंगलदास बांदल लोकसभा लढवणार कि विधानसभा याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

14 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

14 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

14 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

14 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

14 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

14 तास ago