शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबूत (ता.शिरुर) येथील ५५ वर्षीय महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज (दि.२६) घडली असुन जांबुतच्या बागवस्ती परिसरात हादुर्दैवी प्रकार घडला आहे. मुक्ताबाई भाऊ खाडे असे या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. यामुळे वनविभागाचा गलथान कारभार समोर आला असुन शिरुर वनविभागाविरुद्ध नागरिकांचा प्रंचड रोष वाढलेला आहे .वनपरिक्षेत्र अधिकारी हे मनमानी कारभार करत असून ठोस उपाययोजना राबवताना दिसुन येत नाही अशी नागरिकांनामध्ये चर्चा आहे.
सदर महिला हि रविवारी (दि.२५) रोजी सायंकाळ पासुन बेपत्ता होती. आसपासच्या परिसरात शोधाशोध करुनही मुक्ताबाई खाडे यांचा शोध लागला नाही. सदर भागात बिबट्याचे मोठे वास्तव्य असून संशय निर्माण झाल्याने कुटुंबीयांनी वनविभागाच्या कर्मचारी व अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली. यावेळी वनविभागाकडून परिसरातील शेतांमध्ये शोधाशोध केली असता सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आजूबाजूच्या उसाच्या शेतात शोध घेतला असता या महिलेचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे जांबुत आणि परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन तातडीने पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे. शिरुरच्या वनविभागाच्या कार्यालयात ‘वनपरिक्षेत्र आधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा’ अशी म्हणण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आलेली आहे.
शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…