शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील अंकुश खर्डे वय (६०) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला हाताला जखमा झाल्या असुन त्यांच्यावर शिरुर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि घटना (ता.२६) रोजी सकाळी सहा वाजता कान्हूर मेसाई येथील ढगेवाडी वस्तीवर घडली.

 

ढगेवाडी वस्तीवर अंकुश खर्डे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात,ते नेहमी प्रमाणे सोमवार (ता.२६) रोजी सकाळी चालायला गेले. त्याच रस्त्यावर त्यांची विहीर असल्याने पिण्याची पाण्याची मोटार चालू करायला गेले असता. सकाळी सहा वाजता दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक अंकुश खर्डे यांच्यावर हल्ला केला. तरी देखील प्रसंगावधान राखून खर्डे यांनी जोरदार प्रतिकार केला व आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली.

 

या हल्ल्यात खर्डे हे जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत, जखमी झालेल्या खर्डे यांना तातडीने सॊमवारी सकाळी शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात असुन शेतकऱ्यावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याची माहिती तातडीने पुणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस बबन शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली.

 

त्यानंतर वनविभागाचे अधिकारी गणेश पवार, हनुमंत कारकूड, राठोड हे तातडीने हजर झाले. त्यांनी वनविभागाकडून उपचारासाठी लस उपलब्ध करुन दिली. या परिसरात मागील महिन्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. परंतु वन विभागाने पिंजरा लावल्यानंतर बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे.

शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप

शिरुर येथील सेंट जोसेफ शाळेत डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना भोवले; तब्बल १७ जणांवर गुन्हा दाखल

शिरुर; साळवे यांच्या तक्रारीत कुठलेही तथ्य नाही, शाळेच्या बदनामीच्या कटाविरुद्ध न्यायालयात जाणार; नॅन्सी पायस