आरोग्य

केळी खाण्याचे 5 फायदे

महाराष्ट्रासह देशातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी केळी एक आहे. याचे अनेक प्रकार आहेत. केळ्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. शरीराला ऊर्जा देणारे कर्बोदके आणि हृदय मजबूत ठेवणारे पोटॅशियम असत. गोड, पिवळ्या रंगाची केळी जास्त मिळतात. हिरवी केळीही आपल्याकडे उपलब्ध आहेत. हिरवी केळी बहुतेक भाजी म्हणून वापरली जातात.

केळ्यांमध्ये 80 ग्रॅम पोषक घटक आढळतात

ऊर्जा: 65 kcal

प्रथिने: 1 ग्रॅम

चरबी: 0.1 टक्के

कर्बोदकं: 16.2 ग्रॅम

फायबर: 1.1 ग्रॅम

पोटॅशियम: 264 मिलीग्रॅम

केळ्यांचे फायदे

केळ्यांमध्ये पेक्टीन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आतड्यांचं काम सुधारतं. अन्न पचन प्रक्रियेला मदत होते. फायबर शरीरातलं कोलेस्टेरॉल कमी करत. केळ्यांमध्ये फायबर असल्याने खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं. ज्या गोष्टी पचायला कठीण असतात त्या केळ्यांमधल्या कर्बोदकांमुळे पचन प्रक्रियेला मदत करतात. केळ्यांमुळे जीवाणूंच्या वाढीला प्रोत्साहन देतं. असिड निर्मितीत योगदान देतं.

हृदय सुरक्षित:- केळ्यांमध्ये पोटॅशियम असतं. शरीरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या इलेक्ट्रोलाइट्सपैकी एक आहे. यामुळे हृदयाचं काम सुधारतं. शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन राहत. रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तदाब कमी करण्यासाठी आणि हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी पोटॅशियम उपयुक्त असल्याचं सिद्ध झालं आहे. साहजिकच केळी खाणं शरीराला फायदेशीर असत.

छातीतली जळजळ:- केळी पोटातल्या असिडचं संतुलन राखतं. ल्युकोसायनिडिन आतड्याचे पातळ आवरण घट्ट होण्यास मदत करते. पिकलेली केळी छातीत जळजळीपासून आराम देते.

ऊर्जा:- केळी शरीराला उच्च उष्मांक ऊर्जा प्रदान करते. इतर फळांच्या तुलनेत केळीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. फायबरसह सुक्रोज, फ्रक्टोज, ग्लुकोज शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतात. पोटॅशियम स्नायूंच्या हालचालींना मदत करते आणि पेटके कमी करते.

तणाव कमी करत:- केळीमध्ये आढळणारे ट्रिप्टोफॅन हे अमिनो ऍसिड शरीराद्वारे सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होते, जे मेंदूला शांत करण्यास मदत करते.हे सेरोटोनिन मेंदूला आराम करण्यास मदत करते. हे तणाव दूर करते आणि उत्साही करते.

केळी कोण खाऊ शकतं?

हो, प्रत्येकजण केळी खाऊ शकतो. काहींना केळ्याचा त्रास होऊ शकतो. जसं काहींना मायग्रेनचा त्रास होतो. काहींना अलर्जी असू शकते. तुम्हाला अलर्जी असेल तर केळं खाल्ल्यावर काही मिनिटात त्रास होऊ लागतो. अशा प्रकारच्या ऍलर्जींना अॅनाफिलेक्सिस म्हणतात. असे झाल्यास, त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी फार केळं खाऊ नये. काही औषधं रक्तातली पोटॅशियमची पातळी वाढवू शकतात. अशी औषधे वापरत असल्यास, केळीसारखे पोटॅशियम जास्त असलेले पदार्थ खाण्यापूर्वी काळजी घ्या.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

22 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

22 तास ago