फुफ्फुसातील संसर्ग रोखतो:- गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित राहतो. याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो.
पोटाच्या तक्रारींवर गुणकारी:- पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो.
आंबट ढेकरींपासून सुटका:- गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते.
सांधेदुखीतून सुटका:- सांधे दुखत असतील तर गूळ आणि आलं एकत्र करून खाल्ल्यास फायदा होतो. दररोज आलं आणि गुळाचा एक खडा खाल्ल्यास सांधेदुखीला आराम पडतो.
थकवा दूर होतो:- गूळ खाण्यानं शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल तर जरूर गूळ खावा.
रक्ताची कमतरता भरून निघते:- गूळ हा लोहाचा मोठा स्रोत आहे. तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर रोज गूळ खाण्यानं तात्काळ फायदा होतो. गूळ खाण्यानं शरीरातील लाल पेशींची संख्या वाढते. त्यामुळे गर्भवती महिलांना डॉक्टर गूळ खाण्याचा सल्ला देतात.
रक्तदाब नियंत्रणात राहतो:- गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
हाडं मजबूत होतात:- गुळात कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक असतं. हाडांना बळकट करण्यात हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे गूळ खाण्यानं हाडांसाठीही लाभदायी ठरते.
शरीर कार्यक्षम राहत:- गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणे उपयुक्त ठरते. दुध आवडत नसल्यास एक कप पाण्यात पाच ग्रॅम गूळ, थोडासा लिंबू रस आणि काळे मीठ घालून प्यायल्यास थकवा दूर होईल.
सर्दीवरही गुणकारी:- सर्दी-पडसं दूर करण्यासाठीही गूळ लाभदायी ठरतो. काळीमिरी आलं आणि गूळ मिसळून खाल्ल्यास सर्दी-पडसं कमी होतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं. आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातील खवखव, जळजळ दूर होते.
डोळ्यांसाठीही लाभदायी:- गूळ खाल्ल्यानं डोळ्यांची क्षीणता कमी होते. दृष्टी सुधारण्यासही मदत होते.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…