आरोग्य

भरपूर कॅल्शियम देणारे ५ शाकाहारी पदार्थ, मुल दूध पित नसतील तर ‘हे’ पदार्थ खाऊ घाला

हाडं बळकट होण्यासाठी मुलांनी दूध प्यायला पाहिजे असं अनेक महिलांचं म्हणणं असतं, पण मुलांना नेमकं दुधाचंच वावडं असतं. काही मुलांना दूध अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते दूध प्यायला टाळाटाळ करतात.

अशावेळी मुलांना कॅल्शियम मिळणार कसं असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यांना इतर काही पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ घालू शकता ज्यातून त्यांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळू शकेल. त्यातला पहिला पदार्थ आहे नाचणी. नाचणीच्या पिठाचे इडली, डोसा, पराठे असे वेगवेगळे पदार्थ करून मुलांना खाऊ घाला.

शेवग्यामधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. शेवग्याचं सूप किंवा शेवग्याची भाजी मुलांना द्यायला हवी.

भेंडीची भाजी हा बऱ्याच लहान मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ. त्यामुळे मुलांना भेंडीची भाजी भरपूर खाऊ द्या. कारण भेंडीमधून भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं.

भरपूर कॅल्शियम देणारा आणखी एक पदार्थ आहे तीळ. मुलांना गोड आवडत असेल तर तीळाचे लाडू, चिक्की असं खायला करून द्या. किंवा मग मुलं थोडी मोठी असतील तर तिळाची चटणी द्या.

रताळ्यांमधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. त्यामुळे फक्त उपवासाच्याच दिवशी नाही तर एरवीही तुम्ही रताळे खा आणि मुलांनाही खाऊ घाला. रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए देखील भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे मुलांच्या डोळ्यांसाठीही रताळे खाणं चांगलं आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

3 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

17 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

23 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

24 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago