आरोग्य

जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमकं कधी प्यायल्याने फायदा होतो…

ताक हे दुग्धजन्य पदार्थ आहे. ताक पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. प्राचीन काळापासून जेवणासोबत दही किंवा ताक वाढण्याची पद्धत आहे. ताकाची चव आंबट जरी असली तर, जेवणानंतर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यासह शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासही मदत होते.

ताक हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. यामुळे स्नायू बळकट होतात. मुख्य म्हणजे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वेट लॉस आणि पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते. ताकामध्ये दुधापेक्षा कमी कॅलरीज असून, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी १२ आणि पोटॅशियम यांचे प्रमाण अधिक असते.

जेवणासोबत आपण एक ग्लास ताक पिऊ शकता. ग्लासभर ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. अनेकदा लोकांना अन्न खाल्ल्यानंतर गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे जेवणासोबत ग्लासभर ताक प्या. ताकामध्ये प्रोबायोटिक्स असते. ज्यामुळे शरीराचे तापमान वाढत नाही. जेव्हा आपण खूप तेलकट आणि मसालेदार पदार्थ खातो. तेव्हा शरीरातील तापमान वाढते. त्यामुळे ग्लासभर ताक प्यायल्याने या समस्यांपासून आराम मिळतो.

ताकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. हे प्यायल्याने हाडं मजबूत होतात. आणि स्नायूंना बळकटी मिळते. नियमित एक ग्लास दूध प्यायल्याने दात मजबूत होतात.

ताक हे एक असे दुग्धजन्य पदार्थ आहे, ज्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण फार कमी असते. ताक वजन कमी करण्यासाठी आणि शरीराला उर्जा देण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. दुपारच्या जेवणासोबत ग्लासभर ताक प्यायल्याने लवकर भूक लागत नाही.

ताक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. ऋतू बदलांनुसार होणारे आजार दूर करण्यासाठी आपण ताक पिऊ शकता. दुपारच्या जेवणात ग्लासभर ताक प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. ताक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतील. जे आपल्या यकृतावर आणि इतर अवयवांवर परिणाम करतात.

ताक प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होत नाही. रात्रीच्या जेवणासोबत ग्लासभर ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. दुपारच्या जेवणात १ ग्लास ताक प्यायल्याने बीपीच्या समस्येपासून आराम मिळतो. ज्यांना रक्तदाब असंतुलनाची समस्या आहे त्यांनी जेवणासोबत १ ग्लास ताक प्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

20 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago