आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. यामुळेचे आयुर्वेदात आपल्याला आंवळ्याचे जूस घेण्याचा सल्लाही दिला जातो.
अँटिऑक्सिडेंटने समृद्ध असलेल्या आवळ्याच्या ज्यूसचे फायदे जाणून आपणही याला आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट कराल.
रोगप्रतिकारशक्ती वाढते: जर आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत व्हावी, असे वाटत असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे ज्यूस प्यायला सुरुवात करा. हिवाळ्यात आवळ्याचे ज्यूस रोज प्यायल्याने आपण वारंवार आजारी पडण्यापासून वाचू शकाल.
जर आपल्याला आपले वजन कमी करण्याचा प्रवास सोपा कारयचा असेल, तर आपण आवळ्याचे ज्यूसही घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे, आंवळ्याचे ज्यूस आपल्या शरिरातील मेटाबॉलिज्म वाढवण्यासही उपयुक्त ठरू शकते.
आवळ्याच्या ज्यूसमध्ये आढळणारे सर्व घटक आपल्या आतड्याचे आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारू शकतात. आवळ्याचे ज्यूस रोज प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्यांही दूर होतात.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी आवळ्याच्या ज्यूसचे सेवन केली जाऊ शकते. याशिवाय, आवळ्याचे ज्यूस रोज प्यायल्याने दृष्टी सुधाण्यासही मदत मिळते.
स्ट्रेस दूर करण्यास फायदेशीर: आवळ्याचे ज्यूस प्यायल्याने आपला स्ट्रेस अथव तणावही बऱ्याच अंशी दूर होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही आवळ्याच्या ज्यूसचा दैनंदीन आहारात समावेश केला जाऊ शकतो. अर्थात आवळ्याचे ज्यूस आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…
बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…
न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…
कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…