आरोग्य

प्राण्यांनाही होतो कॅन्सर, काय आहेत लक्षणे, होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची

घरात पाळीव प्राणी ठेवताना त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः त्यांना कशामुळे कोणते आजार होऊ शकतात. कोणत्या आजारांचा संसर्ग होऊ शकतो. पाळीव प्राण्यांनाही कर्करोगासारखा दुर्धर आजार होऊ शकतो. याबद्दल अनेकांना कल्पना नाहीये. पण, पाळीव प्राण्यांना हा आजार होतो. त्याची कारणे काय असतात आणि लक्षणे कोणती दिसतात.

कॅन्सरचे प्रकार

आस्ट्रीयो, सार्कोमा, कार्सिनोमा, लिम्फोमा, मॅलेनोमा, लायपोमा हे कॅन्सरचे प्रकार प्राण्यांमध्ये आढळतात. मांजरांमध्ये फेलाईन ल्युकेमिया व्हायरस हा कॅन्सरशी संबंधित आहे. मॅलिग्नंट प्रकारातील कॅन्सरच्या पेशी शरीरात वेगाने वाढतात, त्यामुळे गाठी निर्माण होतात.

जनावरांमध्ये कॅन्सर होण्याची कारणे

प्रदीर्घ वेळ उन्हात राहणे

धूम्रपान क्षेत्रात (स्मोकिंग झोन) प्राण्यांचा वावर

कीटकनाशक व केमिकलचा प्रभाव

हालचाली कमी असणे

डबाबंद अथवा दूषित अन्न सेवन

यामुळे जिभेखाली, जबड्यात, जननेंद्रियांमध्ये, लिव्हर, किडनी, अन्ननलिका या अवयवांमध्ये कर्करोग होतो.

जनावरांना कर्करोग झाल्याची प्रमुख लक्षणे

वजन कमी होणे

भूक मंदावणे किंवा खाणे-पिणे बंद होणे

नाक, तोंड किंवा शौचाच्या जागेतून रक्त पडणे

श्वास घेण्यास व चावण्यास त्रास होणे

उलटीमध्ये रक्त पडणे

तीव्र वेदना होणे

दुर्लक्ष टाळा, तत्काळ उपचार घ्या

प्राण्यांमध्ये या लक्षणांची सुरुवात होताच त्वरित काळजी घेणे गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यास आजार गंभीर बनतो आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे पशुचिकित्सकांकडे जाऊन वेळेत उपचार करणे महत्त्वाचे आहे.

जनावरांच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल.

सकाळ-संध्याकाळ फिरवताना प्राण्यांना मास्क लावणे

पौष्टिक आणि सकस आहार देणे

वजनावर नियमित लक्ष ठेवणे

श्वान किंवा अन्य प्राणी विकत घेताना त्यांच्या वैद्यकीय इतिहासाची चौकशी करणे

अनुवंशिक आजारांची माहिती घेणे

जनावरांमध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी त्यांचा आहार सकस ठेवा. उद्भवणाऱ्या कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच जवळच्या पशुवैद्याकडे उपचार घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

3 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

8 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

8 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

8 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

8 तास ago