Categories: आरोग्य

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

हिवाळा आला की, शरीराला जास्त विश्रांती हवी असते. शरीराचे तापमान कमी होते आणि त्यामुळे शरीर उबदार राहावे म्हणून कॅलरीयुक्त अन्नपदार्थ खाण्याची इच्छा होते. हे कॅलरीयुक्त पदार्थ अनेकदा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतात.

कोलेस्ट्रॉल हा एक फॅटी पदार्थ आहे, जो रक्तात असतो. अति प्रमाणात रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण झाल्यामुळे रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात. तसेच आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. एवढंच काय, तर वेळेवर उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि स्ट्रोकचासुद्धा धोका वाढतो.

उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या ही तुमच्या पूर्वजांना असेल, तर ती तुम्हालासुद्धा असू शकते. पण, अनेकदा अयोग्य जीवनशैली आणि पोषक आहाराच्या कमतरता यांमुळेही कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. जर एखादी व्यक्ती निरोगी असेल, तर त्यांनी नियमित ३०० ग्रॅमपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉलचे सेवन करू नये आणि ज्या व्यक्तीच्या शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त असेल, त्यांनी दररोज २०० ग्रॅमपेक्षा कमी सेवन करावे.

हिवाळ्यात खालील गोष्टी खाऊ नये

साखरयुक्त गोड पेये

हिवाळ्यात आईस्क्रीम आणि इतर गोड पदार्थ खाणे टाळावे. आईस्क्रीम, केक, पेस्ट्री व कुकीज यांसारख्या बेक केलेल्या वस्तूंमध्ये साखर मिसळली जाते. भाजलेल्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट मुबलक प्रमाणात असते. त्यात साखरेचा समावेश केल्यामुळे शरीरातील ट्रायग्लिसराइड्स वाढतात आणि एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल)ची पातळी कमी होते. सॉफ्ट ड्रिंक्स आणि ज्यूसमध्ये साखरयुक्त पदार्थ असतात आणि त्यामुळे वजन वाढू शकत. परिणामी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा वाढू शकते.

कुकीज, केक व पेस्ट्री हे पदार्थ लोणी आणि साखरेचा वापर करून तयार केले जातात. त्यामुळे या पदार्थांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. पण, गोड पदार्थ पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही बेकिंग करता तेव्हा लोण्याऐवजी सफरचंद किंवा केळ्याचा वापर का. गोड पदार्थासाठी बेरीसह कमी फॅट्सयुक्त थंड दही वापरा.

लाल मांस: हिवाळ्यात लाल मांस खाणे टाळा. “इतर कोणत्याही मांसापेक्षा कोकराचे मटण आणि डुकराचे मांस यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स जास्त प्रमाणात असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात आधीच खूप जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असेल, तर या पदार्थांचे सेवन धोकादायक ठरू शकते आणि जर त्यांना हृदयविकाराशी संबधित समस्या असेल, तर हे पदार्थ अतिशय घातक ठरू शकतात. ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असलेले मासे आणि भाजलेले चिकन वरील पदार्थांना उत्तम पर्याय आहे.

तळलेले पदार्थ: भजी, फ्राइज, बटाटा चिप्स, चिकन विंग्स इत्यादी तळलेले पदार्थ हिवाळ्यात खूप आवडीने खाल्ले जातात; पण तळलेल्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. हे पदार्थ चवीला चांगले असले तरी ते धोकादायक ठरू शकतात. जर तुम्हाला तळलेले अन्नपदार्थ आवडत असतील, तर एअर फ्रायर वापरा आणि ऑलिव्ह ऑइलचा समावेश करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

20 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

21 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

1 दिवस ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

1 दिवस ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

1 दिवस ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

1 दिवस ago