मीठ आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय कोणतंही अन्न टेस्टी लागत नाही. पण मीठ जास्त खाल्लं तरी समस्या होतात आणि कमी खाल्लं तरी सुद्धा. त्यामुळे मीठ योग्य प्रमाणातच खाल्लं पाहिजे. पण असेही काही आजार असतात ज्यात मीठ कमी खावं किंवा पूर्णपणे टाळावं लागतं, कारण जास्त मीठ शरीरावर खूप वाईट परिणाम करू शकते. खाली जाणून घ्या कोणत्या आजारांमध्ये मीठ टाळणे आवश्यक आहे.
हाय ब्लड प्रेशर
मिठामध्ये सोडियम असतं, जे ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब वाढवण्याचं काम करतं. हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांना मीठ कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून रक्तदाब नियंत्रित राहील.
हार्ट डिसीज
हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर किंवा इतर हृदयविकार असलेल्या रुग्णांनी मीठ कमी खावं. जास्त मिठामुळे ब्लड प्रेशर वाढतं आणि हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
गाऊट समस्या
गाऊटमध्ये सांध्यामध्ये सूज व तीव्र वेदना होतात. जास्त मीठ व सोडियमचं सेवन केल्यास शरीरातील यूरिक अॅसिड वाढतं, ज्यामुळे गाऊटचे त्रास अधिक वाढू शकतात.
किडनीचे आजार
किडनी फेल्युअर किंवा इतर गंभीर किडनी रोगांमध्ये जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाणी आणि सोडियमचं प्रमाण बिघडतं. यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि स्थिती अधिक बिघडू शकते.
शरीरातील सूज
जर पाय, हात किंवा शरीराच्या इतर भागात सूज असेल तर मिठाचं सेवन कमी करणं आवश्यक आहे. जास्त मिठामुळे शरीरात पाणी धरून ठेवलं जातं, ज्यामुळे सूज वाढते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…