आरोग्य

रोज फक्त २० मिनिट उन्हात बसा, तुमच्या शरीराला मिळेल एनर्जीचा बुस्टर डोस

निरोगी राहण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. पहिली म्हणजे आहार आणि दुसरी म्हणजे नियमित व्यायाम. चांगल्या आरोग्याबाबत बोलताना बहुतेक लोक फक्त आहारावर फोकस करतात. काही लोक पोषण मिळणारं अन्न खातात, तर काही जण सप्लिमेंट्स घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की, रोजची थोडीशी सूर्यकिरणं सुद्धा तुम्हाला निरोगी ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात.

सूर्यप्रकाशाचे आश्चर्यकारक फायदे

हृदयाचं आरोग्य सुधारतं

थोडासा UV प्रकाश ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो. त्यामुळे सूर्यप्रकाश हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यात मदत करतो.

मूड सुधारतो

सूर्यप्रकाश फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. सूर्यप्रकाशामुळे सेराटोनिन नावाचा हार्मोन सक्रिय होतो, ज्यामुळे ऊर्जा वाढते आणि मन प्रसन्न राहतं.

झोपेची क्वालिटी सुधारते

चांगली झोप ही निरोगी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. सकाळची सूर्यकिरणं शरीरातील बायोलॉजिकल क्लॉक रीसेट करतात, ज्यामुळे गाढ आणि शांत झोप लागते.

हाडे आणि स्नायू मजबूत होतात

सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन D तयार होतं, जे कॅल्शियम शोषण वाढवते. त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि स्नायूंचं कार्य सुधारतं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

रोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवल्याने इम्युनिटी मजबूत होते. त्यामुळे शरीर अनेक आजारांपासून आणि संसर्गांपासून सुरक्षित राहत.

दीर्घायुष्य मिळू शकतं

ज्यांना नियमितपणे सूर्यप्रकाश मिळतो, ते लोक सामान्यतः अधिक निरोगी आणि दीर्घायुषी असतात. सूर्यप्रकाश शरीरातील जैविक प्रक्रिया संतुलित ठेवतो.

काही गोष्टी लक्षात ठेवा

दुपारच्या तीव्र उन्हात जास्त वेळ राहू नका. डोळ्यांची आणि त्वचेची काळजी घ्या. सनस्क्रीन, टोपी किंवा चष्म्याचा वापर करा.

उन्हात बसण्याची योग्य वेळ

हिवाळ्यात सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत उन्हात बसणे सगळ्यात चांगलं असतं. असं केल्याने शरीराला आवश्यक तेवढं व्हिटॅमिन डी मिळतं. मात्र, नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी २ ही वेळ सगळ्यात फायदेशीर असते. हाडांच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी दुपारी उन्हात बसणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं.

उन्हात किती वेळ बसाव

व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी उन्हात जास्तीत जास्त २० ते ३० मिनिटे इतकाच वेळ बसावं किंवा फिरावं. हार्ड स्कीन असलेल्या लोकांनी यापेक्षा जास्त वेळ उन्हात बसावं. ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ उन्हात बसू नये कारण याने त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

47 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

51 मिनिटे ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

56 मिनिटे ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

4 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

13 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

13 तास ago