आरोग्य

तांब्याची भांडी वापरण्याचे आयुर्वेदीक महत्त्व

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत.

तांब्याचे भांडे वापरण्यामागील इतर कारणे 

१)पाणी शुद्ध होणे: तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिल्यास विविध प्रकारचे रोग दूर होतात. विशेषत: पोटाशी संबंधित समस्या मुळापासून नष्ट होतात.

२)त्वचा उजळते: तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने त्वचेतील लुळेपणा दूर होतो. डेड स्कीन(मृत त्वचा) निघून जाते आणि चेहरा नेहमी उजळ दिसतो.

३)थायरॉइड आजार दूर होतो: तांब्याचा स्पर्श असलेले पाणी शरीरातील थायरॉक्सीन हार्मोनला संतुलित ठेवते तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास थायरॉइड आजार नियंत्रणात येतो.*

४)अॅसिडीटी, गॅस दूर होतो: अॅसिडीटी, गॅस किंव्हा पोटाची इतर समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान काम करते. यामुळे पोटाचे सर्व आजार दूर होतात.

५)वजन कमी होते: वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास लाभ होईल. थोड्याच दिवसात फरक दिसून येईल.

६)घातक सूक्ष्मजीव नष्ट होतात: तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरातील घातक सूक्ष्मजीव तसेच डायरिया, अतिसार, कावीळ यासारख्या आजाराला कारणीभूत असलेले किटाणू नष्ट होतात.

७)सांधेदुखीत आराम मिळतो: आजकाल कमी वयातच अनेक लोकांना सांधेदुखीचा आजार होत आहे. तुम्हीही या आजारामुळे त्रस्त असाल तर दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. सांधेदुखीमध्ये तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने लाभ होतो. तांब्याच्या भांड्यातील गुणामुळे शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण कमी होते आणि सांधेदुखीमध्ये होणार्या त्रासापासून आराम मिळतो.

८)अ‍ॅनिमियाशी सामना करतो: शरीरातील अनेक कार्य सुरळीत करण्यासाठी तांब्याचा उपयोग होतो. अगदी पेशींची निर्मीती करण्यापासुन ते पदार्थांतील आयर्न (लोह) व मिनरल्स शोषून घेण्यासाठी मदत होते. म्हणूनच अ‍ॅनिमियाशी सामना करणार्‍यांनी तांब्याच्या भांड्यातून आवर्जून पाणी प्यावे. तांबे रक्तातील लोह वाढवतो व रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.

म्हणून रोगांना दूर ठेवण्यासाठी तांब्याच्याभांड्यांचा वापर करणे जरुरी आहे. आणि म्हणूनच आपण पूर्वीपासूनच तांब्याच्या भांड्यांचा वापर करत आलो आहे, एवढेच नाही तर आपण पूजेतही तांब आणि पितळाच्या भांड्यांचाच वापर करतो.

चला तर जाणून घेऊ आपल्या कडे पूजेत का वापरतात तांब्याच्या वस्तू

आपल्याकडे पूजेत वापरण्यात येणारी ताम्हण, पळी, भांड, देव्हाऱ्यातील देवदेवतांच्या मूर्तीदेखील तांब्यापितळ्याच्या असतात.

कारण तांबं – पितळ या धातूंची सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते.

तांब्या- पितळ्याच्या लालसर व सोनेरी रंगांमुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते व मनाची प्रसन्नता वाढते.

आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता तांब्या- पितळ्याच्या भांड्यात तीन तास ठेवलेले पाणी निर्जंतुक होत असल्याने पाणी उकळण्याचा खर्चदेखील वाचतो.

तांबं आणि पितळ हवेतील बाष्पाच्या प्रक्रियेमुळे काळे पडते. त्यासाठी ते नियमित स्वच्छ करणे आवश्‍यक असते. ताक, लिंबू, राख वापरून ते नीट स्वच्छ होत नाहीत. पितांबरी पावडरचा वापर केल्याने भांडी स्वच्छ तर होतातच शिवाय भांड्यांची चमकही कायम राहते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

13 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

13 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

13 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

13 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

14 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

14 तास ago