आरोग्य

थंडी आणि गुणकारी गुळाचे फायदे

गुळाच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसांत तर गुळ अधिक गुणकारी मानला जातो. याच्या सेवनाने शरीर उबदार होण्यास, जेवण लवकर पचण्यास, शरीराला आर्यन मिळण्यास मदत होते.

घसा खवखवत असल्यास गुळ अतिशय फायदेशीर आहे. गुळ आणि आलं एकत्र गरम करुन खाल्ल्याने फरक पडू शकतो.

थंडीच्या दिवसांत सांधेदुखीच्या त्रासाची शक्यता अधिक असते. अशा वेळी गुळ या दुखण्यातून काही प्रमाणात आराम देऊ शकतो. आलं आणि गुळ, किंवा हे मिश्रण एकत्र दुधा सोबतही घेता येऊ शकतं. संधीवात असणाऱ्या रुग्णांनी थंडीच्या दिवसांत रोज गुळ खाणं फायदेशीर ठरतं.

जेवणानंतर एक छोटा तुकडा गुळ खाल्ल्याने पचना संबंधी समस्या कमी होण्यास मदत होते. गुळाच्या सेवनाने पोटात गॅस होण्याची समस्याही कमी होते.

मासिक पाळीत महिलांना अनेकदा त्रास होतो. यावेळी होणारा त्रास आणि चिडचिडेपणा गुळ कमी करु शकतो. या दिवसात ३ ते ४ वेळा गुळ खाऊ शकता.

ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी गुळ खाणं फायद्याचं आहे. गुळात सोडियम आणि पोटॅशियम असतं. हे शरीरात अ‍ॅसिडचं प्रमाण कंट्रोल करण्यास मदत करतं. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकतं.

गुळ लिव्हर स्वस्थ ठेवण्यास मदत करतो. गुळ शरीरातील हानिकारक टॉक्सिन बाहेर काढण्यास, शरीरातील रक्तप्रवाह सुरळित करण्यास मदत करतो. लिव्हर संबंधी समस्या असल्यास गुळ रोज खाणं फायद्याचं आहे.

शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास गुळ खाऊन ती दूर केली जाऊ शकते. आर्यनच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढवलं जाऊ शकतं. गुळाला आर्यनचा उत्तम स्त्रोत मानला जातो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

11 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago