आरोग्य

जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं का? जाणून घ्या…

वेगवेगळ्या फळांचं सेवन करून आरोग्य चांगलं राहतं. फळांचं सेवन केल्याने पोटासंबंधी, त्वचेसंबंधी आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. सोबतच फळांमधील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. या वेगवेगळ्या फायद्यांमुळे लोक भरपूर फळांचं सेवन करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, फळांचं जास्त सेवन करणंही नुकसानकारकही ठरू शकतं. 

फळांमध्ये आढळणारं फ्रुक्टोज लठ्ठपणा, दातांमध्ये इन्फेक्शन आणि पचनासंबंधी समस्यांचं कारण बनू शकतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा निरोगी रहायचं असेल तर केवळ फळं खाण्याऐवजी संपूर्ण संतुलित पौष्टिक आहार घ्यायला हवा. कधीही कोणत्याही डाएट ट्रेन्डला विचार न करता फॉलो करू नये. 

बरेच लोक लवकर वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त फळांचं सेवन करतात. मात्र, असं करण्याचा डॉक्टर किंवा फीटनेस एक्सपर्ट अजिबात सल्ला देत नाहीत. उलट जास्त फळं खाणं आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण फळांमधील फ्रुक्टोजने लठ्ठपणा वाढतो. 

त्यासोबतच प्रमाणापेक्षा जास्त फळं खाल्ल्याने सूज, जुलाब आणि पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. फळांमध्ये फायबर आणि नॅचरल शुगर असते. ज्याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. इतकंच नाही तर फळांमध्ये आढळणारं नॅचरल अॅसिड आणि शुगरमुळे दातांच्या समस्याही होतात. तसेच फळांमधील नॅचरल शुगरने ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचाही धोका असतो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

15 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago