क्राईम

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…

सांगली : राज्यभरात अनेक ठिकाणी खोटे लग्न लावून गंडा घालणार्‍या टोळीने कर्नाटकमध्येही अनेकांना फसवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळीतील पल्लवी मंदार कदम तथा परवीन मोबीन मुजावर (रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर) हिने धुळे, शिरूर आणि कर्नाटकातील निपाणी येथील अनेकांची खोटी लग्ने लावून फसवणूक केली आहे. सध्या फसवणूक करणार्‍या टोळीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोटे लग्न लावून फसवणूक करणार्‍या दोन टोळ्यांचा संजयनगर पोलिसांनी नुकताच छडा लावला आहे. एका टोळीने सांगलीतील एका तरुणाची फसवणूक केली आहे. संशयित पल्लवी मंदार कदम तथा मूळ नाव परवीन मोबीन मुजावर (रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर) हिचे पहिले लग्न झाले असताना तिचे एकाशी दुसरे लग्न लावण्यात आले. मूळ नाव परवीन मुजावर असताना तिने पल्लवी कदम अशी स्वत:ची ओळख सांगितली होती.

लग्न लावून देण्यासाठी एजंट राणी ऊर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार (रा. पंचशीलनगर, सांगली), राधिका रतन लोंढे (रा. न्यू इंग्लिश स्कूलजवळ, मिरज), सुमन दयानंद वाघमारे (रा. वैरण बाजारजवळ, मिरज) आणि नाईक नामक महिला (रा. कलानगर, सांगली) यांनी पुढाकार घेतला होता. फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या युवकाने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून चौघींना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, परवीन मुजावर हिने सांगलीतील युवकाबरोबरच धुळे, निपाणी आणि शिरूर येथेही खोटे लग्न करून फसवणूक केल्याचा प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला आहे. सध्या फसवणूक करणार्‍या टोळीची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर कारागृहात रवानगी केली आहे. लवकरच धुळे, शिरूर आणि निपाणी पोलिस चौकशीसाठी परवीन मुजावर हिचा ताबा घेण्याची शक्यता आहे, पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

शिरूर तालुक्यातून नवरीने लग्नानंतर ठोकली धूम…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…

शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

19 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

19 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

19 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

19 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

19 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

19 तास ago