घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ ही जिभेच्या मागच्या बाजूला, वरच्या बाजूने लोंबणारी, वरची बाजू ४-५ मिमी जाडीची व लांबी सुमारे २ सेंमी व खालची बाजू टोकदार अशी साधारणतः त्रिकोणी आकाराची, स्नायूंची बनलेली असते. ज्यावेळी जीभ आत घेऊन ‘आ’ असा आवाज करतो तेव्हा इतर माणसांना ही पडजीभ नीट दिसते. तिच्या लोंबणाऱ्या टोकाला सूज येते. त्यामुळे तिची लांबी वाढते व ती झोपेत श्वसनमार्गात अडथळा निर्माण करते. त्यामुळे प्रत्येक उच्छवासाचे वेळी ती कंप पावते. त्यामुळे होणाऱ्या आवाजाला घोरणे म्हणतात.
आपण ‘घोरतो आहोत’ हे ज्याचे त्याला समजत नाही. पण घरातील इतरांना त्रास होतो, त्यांची झोपमोड होते, तर काहींना भीती वाटते.
अंगठ्याच्या टोकाला थोडी हळदपूड घेऊन, तोंड उघडून, त्यावेळी आंगठा तोंडात ठेवून ती हळदीची पूड पडजिभेला लावावी. हे काम दिवसातून दोन तीन वेळा करावे. हळद जंतुनाशक व सूजनाशक असल्याने हळद लावण्याचा फायदा होतो.
घशातील उष्णता कमी करण्यासाठी आपण घरात बनवतो ते साजूक तूप, मानेला बाहेरून चोळावे. रोज दोनदा. याने घशातील सूज कमी होते.
प्राणायामातील कपालभाती करण्याने अनेक फायदे होतात, त्याने सर्व श्वसनसंस्था निरोगी राहते.
उशी न घेता झोपायची सवय करावी. सुरुवातीला २ इंच जाड उशी असेल तर हळुहळू तिची जाडी दीड इंच, नंतर एक इंच, अर्धा इंच अशी दर ८-१० दिवसांनी कमी कमी करत जावे. म्हणजे त्या त्यावेळी शरीराची सवय बदलत जाते.
शक्यतो कुशीवर झोपावे.
झोपताना नाकात २-२ थेंब देसी गाईचे तूप घालावेत, याला नस्य म्हणतात. यावेळी मान जास्तीत जास्त मागे करून नाक काटकोनात यावे, म्हणजे टाकलेले तुपाचे थेंब नाकामागील पोकळी मध्ये जाईल. त्याचवेळी ४-५ मिनिटे तरी त्याच स्थितीत रहावे, मग स्थिती बदल करावा.
वजन वाढले की घोरण्याची समस्या होते, म्हणून शक्यतो वजन वाढू देऊ नये.
झोपण्यापूर्वी अनेकांना विडी, सिगारेट, दारू पिण्याची सवय असते. याने उष्णता वाढत असल्याने घोरणे थांबवण्यासाठी या व्यसनांपासून दूर राहावे.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…