आरोग्य

तुळशीची पाने रोज चावून खा! अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते.
तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने चावून खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, श्वसन संस्थेस मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. या सर्व कारणांमुळेच तुळशीची पाने चावून खाणे ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित सवय ठरते.
तुळशीच्या पानांत नैसर्गिक औषधी गुण असून सर्दी-खोकला आणि ताप यांपासून संरक्षण मिळते, तसेच त्वचेचे आणि पचनाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. तुळशीमध्ये जीवनसत्त्वे सी, ए, के आणि बी-कॉम्प्लेक्स, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम असे विविध पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.
तुळशीची पाने चावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे
१) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी
तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. तुळशीचा अर्क रोगप्रतिकारक पेशींची क्रियाशीलता वाढवतो, ज्यामुळे शरीराचे संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण तुळशीच्या ताज्या पानांचा रस रोज पिऊ शकता.
२) बीपी आणि शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर
तुळस त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे, रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानली जाते. क्लीव्हलँड क्लिनिकनुसार , संशोधनातून असे दिसून आले आहे की तुळशीचा रक्तातील साखर कमी करणे आणि रक्तदाब सुधारणे यासह अनेक चयापचय प्रक्रियांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
३) हृदयाचे आरोग्य वाढवते
तुळशीची पाने हृदयाशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास देखील मदत करतात. तुळशीची पाने रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल सुधारून हृदय निरोगी ठेवतात.
४) स्ट्रेसपासून मिळेल आराम
तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास देखील मदत होईल. खरंतर, तुळशीमध्ये अ‍ॅडॉप्टोजेन गुणधर्म असतात. तुळशीतील हा असा एका नैसर्गिक गुणधर्म आहे, जे शरीराला ताणतणावाचा सामना करण्यास आणि मानसिक संतुलन वाढविण्यास मदत करतात.
५) शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी
शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळशीमुळे शरीरातील ऊर्जा वाढते, यासाठी रोज तुळशीचे पाने चावून खाल्ल्याने अनेक फायदे तर होतात सोबतच शरीरातील एनर्जी देखील वाढते.
६) सर्दी आणि खोकल्यापासून आराम
तुळशीला खोकला, सर्दी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या आजारांवर प्रभावी उपाय मानले जाते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

31 मिनिटे ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

40 मिनिटे ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

44 मिनिटे ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

53 मिनिटे ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

55 मिनिटे ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

58 मिनिटे ago