आरोग्य

इअरफोन सतत वापरुन कानांना येतोय बहिरेपणा, कान कायमचे जाण्यापूर्वी ‘हे’ विसरु नका…

मोबाईल, लॅपटॉप सोबतच इअरफोन, हेडफोन देखील आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनले आहे. आजकाल बहुतेक सगळ्यांच्याच्या गळ्यात आणि कानांत इअरफोन अडकवलेले दिसतात. दिवसांतील बरेच तास आपण या इअरफोनचा सतत वापर करतो. आपल्यापैकी बहुतेकजण गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरतात, जे खरंतर खूप धोकादायक आहे. याचा दीर्घकाळ वापर केल्याने कानांना इजा होण्याबरोबरच ऐकण्याची क्षमताही कमी होते

बदलत्या जीवनशैलीमुळे आपण सगळेच हेडफोन, इअरफोन आणि इअरबडवर खूप अवलंबून आहोत. गाडी चालवताना असो किंवा घरात काम करत असताना, लोक जास्त वेळ कानात इअरफोन लावून ठेवतात, ज्याचा थेट परिणाम आरोग्यासोबतच, कान आणि ऐकण्याच्या क्षमतेवर देखील होतो. इअरफोनच्या वापरामुळे काय नुकसान होते व त्यापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय आहेत.

1) इअरफोन वापरण्याचा खास ६० – ६० फॉर्म्युला कोणता

इअरफोन वापरताना त्याचा थेट परिणाम आरोग्यासोबतच, कान आणि ऐकण्याच्या क्षमतेवर देखील होतो. यासाठीच इअरफोन वापरताना ६० – ६० फॉर्म्युला कायम फॉलो करावा. या नियमानुसार, इअरफोन/हेडफोन वापरताना, त्याचा आवाज जास्तीत जास्त ६० % इतकाच ठेवावा. याशिवाय, तुम्ही सलग फक्त ६० मिनिटेच इअरफोन कानांवर लावून ठेवू शकता. ६० मिनिटांपेक्षा दीर्घकाळ इअरफोन कानांवर लावून ठेवणे धोकादायक ठरु शकते.

मोठ्या आवाजात ईअरफोन लावून ऐकण्याचे तोटे

१) गरजेपेक्षा जास्त वेळ हेडफोन किंवा इअरफोनचा वापर केल्यास आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. बराच काळ हेडफोन्स लावून गाणी ऐकल्यास व्यक्तीचे कान सुन्न अथवा बधीर होऊ शकतात.

२) हेडफोन किंवा इअरफोन यांचा अतिवापर हा आपल्या कानांसाठी हानिकारक ठरतोच, पण त्याचा आपल्या हृदयावरही परिणाम होतो. मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे कर्करोगाचा धोका देखील वाढतो. जास्त वेळ इअरफोन वापरल्याने तुमच्या कानाच्या पडद्यावर परिणाम होतो. ज्यामुळे तुम्हाला कानात वेदना देखील होऊ शकतात. कारण खूप मोठ्या आवाजात इअरफोन कानात लावून ऐकल्याने कानावर दबाव पडतो.

३) डॉक्टरांच्या मते, इअरफोनच्या अतिवापरामुळे कानात वेगवेगळे आवाज येणे, चक्कर येणे, झोप न येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. आपल्या कानांची श्रवण क्षमता केवळ ९० डेसिबल असते, जी हळूहळू ४० ते ५० डेसिबलपर्यंत कमी होत जाते.

४) ऑफिसमध्ये किंवा घरी गाणी ऐकताना तुम्ही तुमचे इअरफोन्स एकमेकांशी शेअर करत असाल तर तसे करणे टाळावे. इअरफोन शेअरिंग केल्याने आपल्या कानात संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो.

५) तासंतास हेडफोन वापरल्याने कानात घाण जमा होते. एक तास हेडफोन वापरल्याने कानात ७०० पटीने बॅक्टेरिया जमा होते. जे कान आणि मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे कानात इन्फेक्शन, ऐकण्यात अडचण अशी समस्या छळू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

8 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

8 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

8 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

10 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

21 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

21 तास ago