आरोग्य

जेवणानंतर तुम्हीसुद्धा ही चूक करता का

हल्ली युरीक ॲसिड, वजन, काेलेस्ट्रॉल वाढलेल्या व्यक्तींची आकडेवारी खूप दिसून येते. अगदी कमी वयातच अनेकांना हा त्रास होतो. यासाठी बदललेली जीवनशैली देखील खूप जबाबदार आहे. पण तरीही आपण रोज ज्या काही चुका वारंवार करतो, त्यामुळेही तब्येतीवर परिणाम होतोच. त्यापैकीच एक चूक म्हणजे जेवणानंतर गटागट पाणी पिणे. बहुतांश लोक ही चूक करतात.

जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा भरपूर पाणी पिता का

जेवण केल्यानंतर आपल्या जठराचं काम सुरू झालेलं असतं. अन्न पचविण्यासाठी मदत करणारे अनेक बॅक्टेरिया, पाचक रस जठरामध्ये तयार होत असतात. अशावेळी जर आपण भरपूर पाणी प्यायलो तर त्या पाण्यामुळे पाचक रस तयार होण्याचं काम थांबतं. पचनक्रिया मंदावते. अन्नपचन व्यवस्थित होत नाही. न पचलेल्या अन्नामुळे मग शरीरात युरीक ॲसिड तयार होतं. शरीरातील बॅड कोलस्ट्रॉलचे प्रमाणही वाढते. अन्नपचन चांगलं झालं नाही तर त्याचा परिणाम साहजिकच शरीरावर अतिरिक्त चरबीचे थर जमा होण्यात दिसून येतो. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच गटागट पाणी पिऊ नये.

जेवल्यानंतर कधी पाणी प्याव

याविषयी तज्ज्ञ असं सांगतात की जेवताना किंवा जेवल्यानंतर खूप पाणी पिऊ नये. तुम्हाला तहान सहन होतच नसेल तर जेवणाच्या मध्ये अगदी घोट घोट पाणी प्या. असं थोडं थोडं पाणी पिणं पचनासाठी मदत करणारं असतं. शिवाय जेवण झाल्यानंतरही एखादा घोटभर पाणी प्या. त्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी थोडं थोडं करून प्या. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

3 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

19 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

19 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago