आरोग्य

तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का

झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शांत झोपेसाठी लोक अनेकविध प्रयत्न करताना दिसतात. कोणी योगा करते, कोणी ध्यान करते, तर कोणी आहारामध्ये बदल करते. अनेकदा आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. काही लोकांना झोपताना पायांमध्ये उशी ठेवून झोपण्याची सवय असते; पण त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? पायांत उशी ठेवल्यास पाठीच्या कण्याला आधार मिळाल्याने तो सरळ राहतो आणि पाठीच्या खालच्या भागावर व कंबरेवरील ताण कमी होऊन आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात.

पायात उशी न ठेवल्यास काय होते…

जेव्हा तुम्ही तुमच्या कुशीवर झोपता तेव्हा वरचा पाय पुढे सरकतो आणि गादीवर टेकतो. त्यामुळे पेल्विस (ओटीपोटात खालच्या आणि मांडीदरम्यानची हाडे जी मणक्याला पायांशी जोडतात तो भाग) आणि खालचा मणका त्यानुसार वळतो (Twist). असे चुकीच्या पद्धतीने झोपल्याने कंबरेच्या भागात, आजूबाजूच्या स्नायूंवर आणि संयोजी उतींवर (connective tissues) अनावश्यक दबाव येऊ शकतो.

पायात उशी ठेवल्यास काय होते…

त्यांनी स्पष्ट केले, “तुमच्या पायांच्या मधोमध उशी ठेवल्याने मणक्याच्या नैसर्गिक वक्रतेला आधार मिळतो, ज्यामुळे तुमची कंबर, पेल्विस व गुडघे सरळ राहण्यास मदत होते. त्यामुळे स्नायूंवरील ताण कमी होतो आणि सायटिकासारख्या आजारांना प्रतिबंध होतो, जिथे पाठीच्या खालच्या भागातील नसा दबल्याने पायांमध्ये वेदना तीव्र होतात. त्याव्यतिरिक्त पायांत उशी ठेवल्याने गुडघ्यांमधील थेट संपर्क कमी होतो आणि कूर्चावरील (दोन हाडांच्या किंवा सांध्यांच्या मध्ये असलेली एक गादी (ऊती) झीज कमी करून सांध्याचे आरोग्य सुधारते. तसेच ही पद्धत शरीराच्या खालच्या भागात रक्ताभिसरण वाढवू शकते, ज्यामुळे चुकीच्या पद्धतीने झोपण्यामुळे शरीराच्या विशिष्ट भागांवर येणारा ताण कमी होतो आणि रक्तवाहिन्यांमधून हृदयाकडे परत जाणारा रक्त प्रवाह सुधारतो.

या पद्धतीवरील थेट अभ्यास मर्यादित प्रमाणात असले तरी, संबंधित संशोधन त्याच्या फायद्यांना समर्थन देते. “द स्पाइन जर्नल आणि द जर्नल ऑफ व्हॅस्क्युलर सर्जरीमधील अभ्यास मणक्याचे आरोग्य आणि रक्तवाहिन्यांमधून हृदयाकडे परत जाण्याचा प्रवाह सुधारण्यासाठी योग्य झोपण्याची स्थिती आणि पायांची उंची यांचे महत्त्व अधोरेखित करतात,” असे डॉ. दीपक कुमार महाराणा यांनी माहिती देताना सांगितले. ते हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल, व्हॅस्क्युलर आणि एंडो व्हॅस्क्युलर सर्जन आणि वरिष्ठ सल्लागार आहेत.

पायात उशी ठेवून झोपण्याचे फायदे…

संधिवात, हर्निएटेड डिस्क किंवा कंबरदुखीसारख्या दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींसाठी पायांमध्ये उशी ठेवण्यासारखी साधी गोष्ट वेदना कमी करण्यास, योग्य पद्धतीने झोपण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकते. “कालांतराने अशा पद्धती दीर्घकालीन वेदना आणि मस्क्युकोस्केलेटल असंतुलनाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. एका कुशीवर झोपणाऱ्या व्यक्ती आणि पाठीच्या कण्याचे उत्तम आरोग्य मिळवणारे या दोहोंसाठी विशेषत: या पद्धतीची शिफारस केली जा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

8 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

8 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

11 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

11 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

11 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

12 तास ago