आरोग्य

लिंबाचा अशा पद्धतीने वापर केल्यास आणखीन तरुण दिसाल

कडक उन्हाळा सुरू झाला आहे. या हंगामात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अनेक पेय पित असतो. अशातच या दिवसांमध्ये लिंबाचा वापर जास्त होतो. कारण उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि इलेक्ट्रोलाइटस देखील कमी होत नाही. पण लिंबू फक्त जेवणातच नाही तर त्वचेच्या समस्यापासुन मुक्तता मिळावी यासाठी देखील वापरला जातो. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात, जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात.

लिंबूमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पुरळ आणि मुरुमांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. तसेच तुमच्या त्वचेला ताजेपणा आणि हायड्रेशन प्रदान करते, ज्यामुळे चेहरा मऊ आणि निरोगी होतो. लिंबाचा योग्य वापर करून त्वचेच्या अनेक समस्या सोडवता येतात.

चेह-यावरील डाग आणि पिगमेंटेशनची समस्या

लिंबूमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी त्वचेचा रंग उजळ करतो. जर तुमच्या त्वचेवर पिगमेंटेशन, डाग किंवा सन टॅनिंगची समस्या असेल तर लिंबाचा रस त्यावर काम करू शकतो. लिंबाचा रस सौम्य ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो.

मुरुमांसाठी उपयुक्त

लिंबूमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावर येणारे मुरुमे आणि पुरळ रोखण्यास मदत करतात. तसेच लिंबाचा रस त्वचेतील अशुद्धता आणि जास्तीचे तेल काढून टाकते, त्यामुळे मुरुमांचा धोका कमी होतो.

स्किन टोन सुधारते

लिंबाचा रस त्वचेचा रंग सुधारण्यासाठी देखील काम करते. लिबांच्या रसाचा वापर करून तुम्हाला चमकदार त्वचा मिळवता येते. लिंबाचा नियमित वापर त्वचेला ताजेतवाने करतो.

त्वचा घट्ट आणि तरुण बनवते

लिंबूमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात. त्याचबरोबर त्वचा घट्ट करण्यास मदत करते, ज्यामुळे सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील फाइन लाइन्सची समस्या कमी होते.

त्वचेवर लिंबाच्या रसाचा वापर कसा करावा

एका भांड्यात लिंबाचा रस काढा, लक्षात ठेवा की तुम्ही लिंबाचा रस थेट त्वचेवर लावू नका. तुम्ही त्यात मध किंवा गुलाबजल मिक्स करू त्वचेला चांगल्या प्रकारे लावा. जे त्वचेला ओलावा देते.

नेहमी लक्षात ठेवा की लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्यानंतर सूर्यप्रकाशात जाऊ नये. जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा. या सर्व खबरदारींसह, तुमच्या त्वचेच्या काळजीच्या दिनचर्येत लिंबाचा समावेश करून, तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

8 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

8 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

14 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

15 तास ago