आरोग्य

पायांना सतत मुंग्या येतात,सूजही येते? ही लक्षणं म्हणजे गंभीर आजारांचा धोका

मानवी शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. शरीराच्या प्रत्येक भागातील कार्य हे वेगळे असते. अनेकदा आपण खूप चालतो. ज्यामुळे त्याचा भार आपल्या पायांवर आणि तळपायांवर येतो. ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. शरीरात काही समस्या आपल्याला असल्यास त्यांची लक्षणे आपल्याला दिसतात. या अवयवांपैकी एक म्हणजे आपले पाय.

आपले पाय आपले संपूर्ण आरोग्य सांगतात. डॉक्टरांच्या मते पायांवरुन आपल्याला शरीराच्या गंभीर आजारांची लक्षणे दिसू लागतात. आपल्या पायांकडे पाहून आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेता येते.

बरेचदा आपल्याला शरीरातील अंतर्गत बदलांची जाणीव नसते. यामुळे काही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. आरोग्याच्या बाबतीत मिळणारे काही संकेत वेळीच समजले तर आपल्याला उपचार करता येतात.

पायांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

1) पायांना सूज येणे

आपल्या पायांना विनाकारण सूज येत असेल तर ते यकृताच्या आजाराचे लक्षण असू शकते. तसेच पायांना सतत सूज येणे हे देखील हृदयाशी संबंधित समस्यांचे लक्षण आहे. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2) पायांच्या त्वचेच्या रंगात बदल 

आपल्या पायांच्या रंग अचानक गडद दिसू लागला. पायांवर लहान तपकिरी ठिपके दिसू लागले तर हे टाइप २ मधुमेहाचे लक्षण आहे. आपल्या पायांवर ही लक्षणे दिसल्यास वेळीच मधुमेहाची तपासणी करा.

3) पायांना मुंग्या येणे

आपल्या पायांना मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवत असेल तर हे मधुमेह न्यूरोपॅथीचे लक्षण आहे. तसेच शरीरात व्हिटॅमिन्स बी १ च्या कमतरतेमुळे पायांना वारंवार मुंग्या येतात. पायांना सुन्नपणा येत असेल वेळीच तपासणी करा.

4) पायांमध्ये जळजळ किंवा तळपायांची आग 

पायांमध्ये जळजळ किंवा तळपायांची वारंवार आग होत असेल तर हे यकृताच्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. आपल्या मज्जातंतूंचे नुकसान, व्हिटॅमिनची कमतरता, हार्मोन्स बदल किंवा खूप थकवा येणे हे देखील कारण असू शकते. डॉक्टर सांगतात की, या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

1 तास ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

3 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

4 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

4 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

4 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

4 दिवस ago