संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात एका ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीसोबत डिजिटल माध्यमातून मोठ्या फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲपवर आलेल्या एका काही सेकंदांच्या व्हिडिओ कॉलमुळे संबंधित व्यक्तीला तब्बल १४ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
संभाजीनगर येथे ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ती अंघोळ करत असताना त्यांना व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ कॉल आला. फोन उचलताच समोरून एक तरुणी बोलताना दिसली. काही क्षणातच कॉल कट झाला, परंतु त्या हा कॉल रेकॉर्ड करण्यात आला होता.
यानंतर काही वेळाने आरोपी हेमंत मल्होत्रा याने फोन करून, “तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे” अशी धमकी दिली. त्यानंतर प्रमोद राठोड नावाच्या बनावट पोलिसाने फोन करून, “तुमच्यावर गुन्हा दाखल आहे, तुम्हाला अटक होईल; सेटलमेंटसाठी हेमंतशी संपर्क करा” असे सांगितले. या धमक्यांना घाबरून, सेवानिवृत्त व्यक्तीने आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर १४ लाख रुपये पाठवले. या प्रकरणी मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंदसिंग तसेच दोन अज्ञात आरोपींवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत असून, नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणूक कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…