आरोग्य

दररोज सकाळी हळदी शॉट्स प्या, रोगप्रतिकारकशक्तीसह मेंदूचे आरोग्य होईल निरोगी

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटिनचा समावेश केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संसर्गाचे आजार होत नाहीत. तुमच्या आहारामध्ये हिरव्या भाज्या, फळं आणि ड्राय फ्रूट्सचा समावेश केल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते. बदलत्या ऋतूमध्ये संसर्गाचे आजार होण्याची शक्यता असते. संसर्गापासून वाचण्यासाठी तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करणे गरजेचे आहे. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये हळदीचा समावेश करू शकता.

हळद तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. हळद भारतीय मसाल्यांमधील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. हळदीमध्ये भरपूर प्रमाणात कर्क्युमिन आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहाण्यास मदत होते. हळद नियमित खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. हळद खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचे संसर्गाचे आजार होत नाही. दररोज सकाळी उठल्यावर हळदीचे शॉट्स प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

हळदी शॉट्सचे फायदे

हळदीमध्ये भरपूर प्रमाणात कर्क्यूमिन आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. हळद खाल्ल्यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. हळदीचे नियमित सेवन केल्यामुळे तुम्हाला कर्करोगाचा धोका नाही होत. हळदीमधील कर्क्युमिनमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. हळदीमुळे तुम्हाला हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह यांच्या सारख्या समस्या होत नाहीत. हळदीचे सेवन केल्यामुळे तुमच्या रक्तातीसल साखर कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये हळदीच्या शॉट्सचा समावेश करतात. हळदीमधील अँटिऑक्सिडेंट्स तुमच्या शरीरामधील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. हळदीमुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुम्हाला जर पिंपल्स, मुरूम आणि चेहऱ्यावरील डागांच्या समस्या असतील तर तुम्ही हळदीचे शॉट्स दररोज प्यायल्यात तर फायदे होतील. हळदीचे नियमित सेवन केल्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. हळदीमधील गुणधर्म महिलामधील पाळी नियमित करण्यास मदत करतात. हळदीमधील कर्क्युमिन तुमच्या मेंदूचे आरोग्य कमी होण्यास मदत होते.

हळदीचे फटके कसे बनवायचे

साहित्य

1/2 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून काळी मिरी आणि 1 कप पाणी मिसळा.

कृती

एका भांड्यामध्या पाणी घ्या आणि त्यामध्ये हळद आणि काळी मिरी पावडर मिक्स करा. पाणी गॅसवर ठेवून उकळा. 5 ते 10 मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करा. या पाण्याचे सेवन करा. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यासोबच हळदीच्या शॉट्समध्ये तुम्ही मध, लिंबाचा रस किंवा आल्याचा रस मिक्स करू शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

17 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

18 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

22 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago