आरोग्य

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नाश्त्यात खा ‘हे’ पदार्थ, शुगर वाढणार नाही

डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी औषधोपचाराबरोबरच योग्य आहार घेणे देखील तितकेच गरजेचे असते. दिवसभरातील आहारात देखील दिवसाची सुरुवात कोणत्या प्रकारच्या नाश्त्याने केली जाते, याचा साखरेच्या पातळीवर थेट परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हा शरीराला ऊर्जा देतो आणि दिवसभरातील रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी अतिशय फायदेशीर ठरतो.

डायबिटीस असणाऱ्यांनी संतुलित आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ, फायबर, प्रथिने आणि गुड फॅटस असलेले पदार्थ सकाळच्या नाश्त्यात समाविष्ट केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते

डायबिटीस असणाऱ्यांसाठी उत्तम नाश्त्याचे पदार्थ कोणते आहेत 

१) मोड आलेल्या कडधान्यांचे चाट

डायबिटीस असणाऱ्यांसाठी उत्तम नाश्त्याच्या पदार्थांपैकी सर्वात पहिला पदार्थ म्हणजे, मोड आलेल्या कडधान्यांचे चाट. मोड आलेली कडधान्ये हलकीशी उकडवून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर करून वर थोडासा चाट मसाला भुरभुरवून घालावा. डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी नाश्ता हा हलका, प्रथिनयुक्त आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला असावा. यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचा चाट हा एक उत्तम पर्याय आहे. चवदार, सहज पचणारा आणि पोषणमूल्यांनी भरलेला हा पदार्थ केवळ स्वाद वाढवत नाही, तर साखरेच्या नियंत्रणातही मदत करतो.

२) बेसन चिला / धिरड

बेसन पीठ किंवा इतर वेगवेगळ्या प्रकराची पौष्टिक पीठ एकत्रित घेऊन आपण त्यापासून पौष्टीक असा चिला किंवा धिरडं तयार करून खाऊ शकतो. डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी नाश्ता निवडताना अशा पदार्थांचा विचार करावा लागतो, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवत असताना शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषणही पुरवतील. अशावेळी बेसन चिला किंवा धिरडं हा एक चविष्ट, झटपट तयार होणारा आणि संतुलित नाश्त्याचा पर्याय ठरतो.

३) हिरव्या मुगाचा डोसा 

डायबिटीस असलेल्या व्यक्तींचा सकाळचा नाश्ता असा असावा जो पचायला हलका, पोषणमूल्यांनी समृद्ध आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारा असेल. हिरवे मूग देखील डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी तितकेच पौष्टीक असतात. आपण हिरव्या मुगाचा पौष्टीक डोसा देखील सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकतो.

४) मिश्र धन्यांचं थालीपीठ 

डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी मिश्र धान्यांच पौष्टीक असं गरमागरम थालीपीठ देखील एक उत्तम पर्याय ठरु शकतो. नाचणी, ज्वारी, बाजरी, हरभरा पीठ अशा मिश्र धान्यांपासून बनवलेले थालीपीठ हळूहळू पचते, त्यामुळे रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होत नाही. मिश्र धान्यांमध्ये नैसर्गिक फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट अधिक वेळासाठी भरलेले वाटते.

५) फ्रुटस आणि ड्रायफ्रुटस 

फ्रुटस आणि ड्रायफ्रुटस देखील डायबिटीस असलेल्या व्यक्ती सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकतात. सकाळच्या नाश्त्यात हे पदार्थ खाल्ल्यास शरीराला नैसर्गिक साखर, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि गुड फॅट्सचा पुरवठा होतो. डायबिटीस असलेल्या व्यक्तींच्या आहारात फळं आणि ड्रायफ्रुट्स यांचा योग्य प्रमाणात समावेश केल्यास हा नाश्ता पोषणमूल्यांनी भरलेला आणि ऊर्जादायी ठरतो.

६) सोया किंवा टोफू 

डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी सकाळच्या नाश्त्यात सोया किंवा टोफू यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. सोया किंवा टोफू यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

2 तास ago

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…

2 तास ago

गुडघेदुखीचा त्रास सतावतो? घरीच करा ‘हे’ खास तेल

गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध…

2 तास ago

मोठी स्वप्ने पाहा, जिद्द आणि मेहनतीने यश मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

ठाणे: ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव…

2 तास ago

विठ्ठल मंदिरातील भाविकांच्या सुविधा आणि नागरिकांच्या हक्कांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार; नीलम गोऱ्हे

पंढरपूर: शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी…

2 तास ago

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसची ‘ReelSeRealTalk’ रील स्पर्धा

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष…

3 तास ago