मुख्य बातम्या

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील हॉटेल तिरंगा समोर आज (दि 18) रोजी पहाटे 5 च्या सुमारास तीन वाहनांचा एक विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, प्रहार संघटनेचे शिरुर तालुका कार्याध्यक्ष संदीप ढाकुलकर हे रांजणगाव येथुन शिक्रापुरकडे जात असताना त्यांना रस्त्यावर अपघात झाल्याचे निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तत्काळ अपघातग्रस्त जखमींना नागरिकांच्या मदतीने वाहनाबाहेर सुरक्षित काढले अन जखमींची अवस्था लक्षात घेता तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान या अपघातामुळे पुणे-नगर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हि कोंडी सोडवण्यासाठी तसेच अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करण्याचे काम शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बांगर, ढाकुलकर आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत आली.

शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या वतीने संदीप ढाकुलकर व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे तत्परतेबद्दल आभार मानण्यात आले. त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पुणे-नगर महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरूर तालुक्यात अनधिकृत दत्तक प्रकरण उघड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर पोलिस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक, हाणामारी, ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल…

Video: शिरूरचे दोन्ही आजी-माजी आमदारांनी गुनाट गावाला भेट देत केली गारपिटीची पाहणी…

शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

1 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

1 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

1 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

17 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

2 दिवस ago