आरोग्य

जेवणात या डाळीचं वरण खा, भराभर वाढेल व्हिटामीन B-12

शरीराला प्रोटीनप्रमाणेच व्हिटामीनही आवश्यक असते. या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे थकवा येणं, कमकुवतपणा, सूज येणं, स्मरणशक्ती कमी होणं, रक्ताची कमतरता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात भारतीयांच्या आहारात डाळींचे खास महत्व आहे. डाळींना प्रोटीनचे भांडार मानले जाते. ठराविक डाळीचे पाणी प्यायल्यानं २१ दिवसांत व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करता येते.

शरीरातलं व्हिटामीन बी-१२ कमी झाल्यास कोणती लक्षणं दिसतात

१) थकवा, कमकुवतपणा येणं,

२) त्वचा पिवळी पडणं,

३) जीभेत वेदना जाणवणं,

४) हातापायांमध्ये झिणझिण्या येणं,

५) श्वास घ्यायला त्रास होणं,

व्हिटामीन बी-१२ वाढवण्यासाठी कोणती डाळ खावी

ही डाळ आपल्या स्वंयपाकघरातील मूगाची डाळ आहे. जी खाल्ल्यानं व्हिटामीन बी-१२ शरीराला मिळते. न्युट्रिशनिस्ट नमानी अग्रवाल यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी हिरव्या मुगाच्या डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. या डाळीत व्हिटामीन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. याचे रोज सेवन केल्यानं व्हिटामीन बी-१२ ची कमतरता दूर होण्यास मदत होते.

मूग डाळीचे फायदे

मूग डाळ प्रोटीनचा आणि व्हिटामीन्सचा चांगला स्त्रोत आहे. या डाळीतील एंटी ऑक्सिडेंट्स शरीरातील फ्री रॅडीकल्सना कमी करतात. ही डाळ फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. मूग डाळीत मिनरल्सही असतात (Ref). हिरवी मूगाची डाळ खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते, फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. या डाळीत साखरेचे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे ब्लड शुगर वाढण्याचा धोका नसतो.

मुगाची डाळ कशी खावी

रात्री झोपण्याच्याआधी १ कप मूग डाळ व्यवस्थित धुवून घ्या. नंतर त्यात १ कप पाणी घालून ठेवा. सकाळी मूग व्यवस्थित भिजले असतील तर रिकाम्या पोटी याचे सेवन करा. डाळ तुम्ही शिजवून तुम्ही भात किंवा चपातीबरोबर खाऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

12 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago