आरोग्य

तांब्याची भांडी वापरताना तुम्ही ‘हे’ नियम पाळता का

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. अलीकडे ट्रेंड म्हणून घरोघरी तांब्याच्या भांड्यांचा वापर केलेला दिसतो. पूर्वी आरोग्याच्या दृष्टीने हा वापर केला जाई. सद्यस्थितीत तांब्याची भांडी पुनर्वापरात आली आहेत, याचा आनंदच आहे. पण त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला तर त्याचे परिणाम शरीराला भोगावे लागू शकतात. म्हणूनच तांब्याच्या भांड्यांचा वापर करताना कोणती काळजी घेतली पाहिजे.

ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी पिणार आहात ते भांडे शुद्ध तांब्यापासून बनवलेले तसेच स्वच्छ असायला हवे.

तांब्याच्या भांड्याच्या आत मधल्या आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूने तांबे वापरलेले हवे कुठलाही दुसरा धातू त्यामध्ये मिक्स नसावा.

भांडे स्वच्छ घासून घेतलेले असावे. भांडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू किंवा चिंचेचा वापर करू शकता.

तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यामुळे पाण्याचे ऑक्सिडेशन होते व भांड्याच्या आत मधल्या बाजूस एक लेयर जमा होते, स्वच्छ करणे खूप गरजेचे असते.

एखादे भांडे आत मधून स्वच्छ करता येत नसल्यास जसे की तांब्याची बॉटल,ज्यामध्ये आपला हात जात नाही व आपण त्या बॉटलची स्वच्छता व्यवस्थित करू शकत नाही त्यामुळे सहसा अशी भांडी वापरणे टाळावे.

तांब्याच्या भांड्यात कधीच उकळलेले पाणी, जास्त गरम पाणी टाकू नये. पाणी उकळलेले असेल तर ते आधी थंड होऊ द्यावे व नंतर ते तांब्याच्या भांड्यात टाकावे.

लिंबू सरबत किंवा कुठलेही आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवू नये कारण हे ऍसिडिक असतात. ज्यामुळे तांब्याचे भांडे आणि ऍसिडिक पदार्थ यामध्ये प्रक्रिया होऊन आपल्या शरीरासाठी घातक असे रसायन तयार होते. दही,आचार या गोष्टी सुद्धा तांब्याच्या भांड्यात ठेवू नये तसेच आंबट पदार्थ भांड्यामध्ये शिजवू नये.

अति सर्वत्र वर्जयत् | म्हणजेच कुठलीही गोष्ट अति प्रमाणात केल्यास त्याचे नुकसान होतात. म्हणून आपली प्रकृती,वातावरण,तहान,आजार, आजाराची अवस्था या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन मगच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.

रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये काही दिवस पाणी प्यायल्या नंतर काही दिवसाचा गॅप ठेवावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

7 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

7 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

23 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

23 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

23 तास ago