आरोग्य

तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या….

मेष: तुम्हाला प्रत्येक कामात खूप मेहनत करावी लागेल. तुम्ही राजकारणात असाल तर सतर्क राहा. विरोधक आज जास्त त्रास देण्याची शक्यता आहे. पाहुण्याचे आगमन होणार आहे त्यामुळे खर्च वाढू शकतो. कामात काही अडचणी आहेत पण सोमवारी रुद्राभिषेक केला तर अडचणी थोड्या कमी होतील.

वृषभ: आजचा दिवस ठिक आहे पण तब्येतीची काळजी घ्या. आहारावर विशेष लक्ष द्या. काही नवीन समस्या येणार आहेत पण तुम्ही प्रत्येक संकटाचा सामना कराल. वृषभ राशीचे जे जातक कला आणि साहित्य क्षेत्रात काम करत आहेत त्यांची प्रतिष्ठा वाढेल. ज्येष्ठ व्यक्तीमुळे व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही शुभ कार्यासाठी खर्च करणार आहात तसेच तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल.

मिथुन: आजचा दिवस उत्तम असून तुमचा मूड चांगला असेल. सर्व क्षेत्रात बुद्धी आणि कौशलाचा वापर केल्यामुळे यश मिळेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या बाबतीत काही दिवसांपासून असलेली संभ्रमाची स्थिती आज संपुष्टात येईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल.

कर्क: लोकांसाठी जे नोकरी, व्यवसाय किंवा राजकीय क्षेत्रात आहेत त्यांची प्रगती होईल. मोठ्या व्यक्तींच्या मदतीने कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रकारे मदत मिळेल. खर्च कमी करा, नाहीतर अडचणी येऊ शकतात. कला-क्रीडा व साहित्य क्षेत्रात जे जातक कार्य करत आहेत त्यांच्या वाटेतील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. मुलांच्या विवाहाचे प्रस्ताव येणार आहेत.

सिंह: तुम्ही हुशारीने काम करणार आहात. कोणत्याही कामात घाई करू नका. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती होणार फक्त कामात फोकस ठेवा. व्यवसायात चढ-उतार राहील. तुम्ही ज्या व्यक्तींना पैसे दिले आहेत ते तुम्हाला पैसे परत देतील. कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा प्लॅन होणार आहे

कन्या: आजचा दिवस फारसा ठिक नाही. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तणावाची स्थिती असेल. विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत करायला हवी. कुटुंबात संपत्तीविषयी थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. व्यापारात लाभाचा योग आहे. गुंतवणूक करा तुम्हाला भविष्यकाळात खूप फायदा होईल.

तुळ: तुमच्या धन संपत्तीत वाढ होणार आहे. कोर्टाच्या कामात निकाल तुमच्याबाजूने असेल. ऑफिसच्या कामात यश असून तुम्ही रणनीतीचे कौतुक होईल. मालमत्ता किंवा जमिनीच्या व्यवहारात उत्तम फायदा आहे. मुलांकडून चांगली फायदा मिळेल. नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर वेळ चांगली आहे.

वृश्चिक: तुमचा प्रभाव सगळ्यांवर पडणार आहे. व्यवसायात चांगले संधी आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मेहनत जास्त करावी लागेल. विरोधक आज फार काही करू शकणार नाही. गुंतवणुकिचा विचार करु शकता, यासाठी तज्ज्ञाचा सल्ला उत्तम आहे. परदेशात जाण्याचे योग आहेत.

धनु: मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. नवीन खर्च समोर येऊ शकतात. कोणीतरी तुमच्यावर खोटे आरोप करण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन कराल. समजा आज प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि अपशब्द बोलू नका.

मकर:  तुम्हाला कामे मार्गी लावायची असतील तर व्यवस्थापन आणि फोकस याला महत्त्व द्या. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क बनतील. शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रगती असून समाजात मान सन्मान वाढेल. आज काही नवीन प्रस्ताव येतील पण त्या प्रलोभनांमध्ये फसू नका. सध्या तरी नव्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करणे चांगले आहे.

कुंभ: आर्थिक बाबतीत सावध राहा. खर्च जास्त झाल्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. कुटुंबाच्या कामात खूप धावपळ होईल. तुमच्या कार्यकुशलतेमुळे सगळेजण प्रभावीत होतील. कामात उत्साह असेल आणि जे काही ठरवलं आहे त्यात यश मिळेल.

मीन: आजचा दिवस ठिक आहे. कुटुंबात वातावरण मानसिक समाधान देणारे आहे. तुमच्या कामातील अडचणी दूर होतील. व्यवसायात लाभाची संधी आहे. नवीन प्रोजेक्ट येतील त्यात फोकस आणि नियोजन हवे. संध्याकाळी एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

57 मिनिटे ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

1 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

1 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

1 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

1 तास ago

नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा तरुणाईच्या संघर्षाचा विजय; सचिन सावंत

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत अखिल भारतीय…

1 तास ago