महाराष्ट्र

सातबारा तुमच्या नावावर असला तरी 3.5 फूटाखालील जमीन सरकारची? जाणून घ्या काय म्हणतो कायदा

मुंबई: आपल्या जमिनीच्या आत काही मौल्यवान वस्तू सापडल्या तर त्या आपल्याच असतील का? नाही. भारतीय कायद्यांनुसार, जमिनीत सापडलेला कोणताही खजिना हा सरकारचा असतो. जाणून घ्या यासंदर्भातील कायदा.

भारतीय निखात-निधी अधिनियम, 1878′ काय सांगतो?

‘Indian Treasure-Trove Act, 1878’ (Amending Act XII of 1891) हा कायदा भारतात लागू आहे. यातील ‘Treasure Trove’ हा शब्द फ्रेंच भाषेतील असून, याचा अर्थ “सापडलेला खजिना” असा होतो.

मराठीत हा कायदा ‘भारतीय निखात-निधी अधिनियम 1878’ म्हणून ओळखला जातो. यातील ‘निखात’ म्हणजे मृदेमध्ये (मातीत) दडलेला कोणताही मौल्यवान जिन्नस होय.

या कायद्यानुसार महत्त्वाचे नियम:

जमिनीत सापडलेल्या कोणत्याही मौल्यवान वस्तूंना ‘खजिना’ म्हणतात.

जर त्याची किंमत ₹10 पेक्षा जास्त असेल, तर जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाला त्वरित माहिती देणे बंधनकारक आहे.

कायद्याचे उल्लंघन केल्यास दंड किंवा 1 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

हा गुन्हा दखलपात्र (Cognizable) आणि अजामीनपात्र (Non-bailable) आहे.

जमिनीच्या 3.5 फूट खालच्या मालकीचा नियम

काही माहितीस्त्रोतांनुसार, जमिनीचा सातबारा जरी तुमच्या नावावर असला तरी, 3.5 फूट खोलीनंतरची जमीन ही सरकारची मानली जाते. याचा अर्थ जर तुम्हाला खोल जमिनीत काही मौल्यवान वस्तू, खजिना किंवा नैसर्गिक संपत्ती (उदा. सोनं, खनिजे) सापडली, तर त्यावर तुमचा हक्क नसून ती सरकारी मालमत्ता ठरते. म्हणूनच, जर तुम्हाला जमिनीत काही मौल्यवान वस्तू सापडल्या तर योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करा आणि कोणत्याही अडचणी टाळा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

24 तास ago