आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. तुम्हाला जोडीदाराची चांगली साथ मिळणार आहे. तुमचे काम ऑफिसमध्ये जास्त वाढले तरी काळजी करु नका, घरी तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. पगारवाढीची शक्यता आहे. घरातील लहान मुलांना आर्वजून वेळ द्यायला हवा. तुम्हाला जेव्हा कामातून मोकळा वेळ मिळेल तो वेळ तुम्ही कुटुंबासोबत राहा, त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल.

वृषभ: आजचा दिवस शुभ असून तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. दुपारनंतर तुम्ही विचार केलेली सगळी कामे पूर्ण होणार आहेत ताणतणाव कमी झाल्यामुळे रिलॅक्स फिल कराल. थांबलेले पेमेंट मिळाल्यामुळे आनंद होईल. व्यवसायात तुम्हाला नवे प्रोजेक्ट मिळणार आहे, पण ते स्विकारताना सगळी कागदपत्र नीट वाचून घ्या.

मिथुन: आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. तुम्हाला प्रत्येक कामात यश आहे. आर्थिक गुंतवणुकिसंदर्भात आज महत्त्वाचा निर्णय घेवू शकता. घरात एखाद्या मंगलकार्याबद्दल चर्चा होणार आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा तसेच शॉपिंगला जाण्यााच प्लॅन कराल. तुमचे मन खूप प्रसन्न राहणार असून प्रियजनांच्या भेटीमुळे तुम्हाला अपार आनंद होणार होईल.

कर्क: तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ असून यश मिळणार आहे. तुम्ही आज धार्मिक कार्य करणार असून दानधर्म देखील कराल. धार्मिक आणि आध्यात्मकि गोष्टीत तुमची रुची वाढेल. एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट देण्याचा प्लॅन करणार आहात. हुशारीने तुम्ही काही प्रोजेक्ट पटपट मार्गी लावाल त्यामुळे वरिष्ठ तुमचे कौतक करतील. व्यवसाय आणि करिअरमध्ये यश असून कुटुंबात सुखसमृद्धीचे वातावरण आहे.

सिंह: तुमच्या आजूबाजूच्या चांगल्या लोकांकडून तुम्हाला प्रेरणा मिळणार आहे. ऑफिसमध्ये सहकारी तुम्हाला मदत करतील, तुम्ही त्यांना टीम वर्कचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजावून देवू शकता. खूप दिवसांपासून सुरु असणारी कोर्ट कचेरी यावर निकाल येण्याची शक्यता आहे. तुमच्या योजना सफल होणार आहेत. तुम्ही कुटुंबासोबत फिरायला जाण्याचे प्लॅनींग कराल.

कन्या: आजचा दिवस चांगला असून तुम्ही क्रिएटीव्ह कामात रुची घेणार आहात. विरोधक थोडा त्रास देण्याचा प्रयत्न करतील पण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही कामात फोकस करा. तुमचे मन कामात लागत नसेल किंवा तणाव वाढला असेल तर तुमची आवड किंवा छंद यात मन गुंतवा. आज मित्र परिवारांपैकी कोणी पैसे मागितले, तर त्याला तुमची परिस्थिती स्पष्ट करुन सांगा आणि शक्यतो उधारी देवू नका.

तूळ: आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने अतिशय चांगला असून तुमच्या कामात तुम्ही अधिक फोकस करणार आहात. बुद्धी आणि मन स्थिर असल्यामुळे आज जे काही काम कराल त्यात यश असेल. अकाऊंट संदर्भात काही फाईल्स असतील तर तयार ठेवा कारण त्याची गरज लागू शकते. तुमच्या चांगल्या वागणुकिमुळे सगळीकडे तुमचे कौतुक होणार आहे. आज कामात वृद्धी होणार असून व्यवसायात नफा होणार आहे.

वृश्चिक: तुमच्या योजना किंवा कल्पना यांची अंमलबजावणी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. राजकारणात तुमची रूची वाढणार आहे. संध्याकाळी कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमच्या खिशावर ताण येवू शकतो, पण आज खर्चाकडे बघू नका, नातेसंबंध अधिक मजबूत असणं जास्त महत्त्वाचं आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ असून करिअर आणि व्यवसायात यश आहे. आज आर्थिक स्थिती उत्तम असेल.

धनु: आज दिवस चांगला असून धनलाभाचा योग आहे तसेच बँक बॅलेन्स वाढणार आहे. आज ऑफिसमध्ये काम वाढणार आहे. खूप धावपळ होणार पण त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्यातील कलाकौशल्य किंवा प्रतिभा सिद्ध करण्यासाठी कामाचा पसारा किंवा गजबजाट करणे गरजेचे नाही. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला असून प्रेमात बहार येणार आहे.

मकर: आजचा दिवस शुभलाभाचा आहे. कामे पूर्ण करण्यातच तुमचा दिवस जाणार आहे. पण काम पूर्ण झाल्यामुळे समाधान मिळेल आणि जीवनात समाधान मिळणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही पेपरवर स्वाक्षरी करताना ती कागदपत्रे नीट वाचा. व्यवसायात नवे काम आहे पण नियोजन योग्य पद्धतीत करा तरच यश मिळेल.

कुंभ: आजचा दिवस शुभलाभाचा असून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. सकाळपासूनच तुम्हाला आनंद देणाऱ्या बातम्या मिळणार आहेत. नवीन लोकांच्या ओळखी करून घ्या किंवा नव्या ओळखी झाल्या असतील तर त्यात संबंध दृढ करा. व्यवसायात नवीन डिल फायनल होणार आहे. तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. धनसंपत्ती वाढणार आहे.

मीन: आज दिवसाची सुरुवात हळूहळू होणार आहे. तुम्हाला ज्या गोष्टी त्रास देतील त्याबद्दल तुम्ही तोडगा काढाल. धनसंपत्तीमध्ये वाढ होणार आहे. बुद्धी चातुर्याने तुम्ही केलेल्या कामाचा रिझल्ट तुम्हाला दुपारनंतर मिळेल. नवीन डिल फायनल करण्याचे काम काही कारणाने पुढे ढकलावे. तब्येतीची काळजी घ्या आणि जास्त ताण घेवू नका.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

11 तास ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

12 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

12 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

17 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

1 दिवस ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

1 दिवस ago