मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात रस्ता खुला करताना सरकारी कामात आत्महत्येची धमकी देत अडथळा

शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर आदेशानुसार गावात जाणाऱ्या रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ग्रामस्थांनी या कामास तीव्र विरोध दर्शवला .व सरकारी कामात आत्महत्येची धमकी देत अडथळा निर्माण केला.

याबाबत मंडलअधिकारी माधुरी बागले (वय ४४) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंडल आधिकारी यांच्या म्हणण्यानुसार, ११ जुलै २०२५ रोजी तहसीलदारांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, (दि. २५) मार्च रोजी दुपारी ३ वाजता ग्राममहसुल अधिकारी अनुजा घुगे, ग्राममहसुल सेवक प्रिती नानेकर, ग्राममहसुल अधिकारी रामदास आरदवाड, आदी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जेसीबी मशीनसह संबंधित जागेवर पोहोचले.

तेव्हा पार्वतीबाई बबन उकिर्ड व त्यांच्या दोन्ही मुलांनी तसेच सुनांनी रस्ता खुला करण्यास आक्षेप घेतला. त्यांनी जेसीबी मशीनसमोर अडथळा निर्माण करत बकेटमध्ये बसून काम थांबवण्याचा प्रयत्न केला. शिवाय, “जर रस्ता खुला केला, तर आम्ही अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करू,” अशी धमकी दिली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल संबंधितांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात कायदेशीर कारवाईसाठी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास टाकळी हाजी औटपोस्टचे पोलीस अंमलदार शरद वारे हे करीत आहेत.

शेतकऱ्यांसाठी रस्ता खुला करत असताना न्यायप्रविष्ठ बाब नसताना जर कुणी तो अडवण्याचा प्रयत्न केला तर अशाच प्रकारची कडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील.. शेतकऱ्यांना शेत जमिनीत जाण्यासाठी रस्ता हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे .अनेक शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे आपला शेतमाल त्यामुळे बाजारपेठेत नेता येत नाही. शिरूर तहसीलदार कार्यालयाकडे याबाबत अर्ज करून रस्ता मिळवता येतो. बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार, शिरुर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

4 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

24 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago