आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ आहे.आर्थिक स्थिती चांगली असून प्रत्येक कामात तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत त्यात तुम्हाला लाभ मिळेल. दुपारनंतर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींसोबत वाद होवू शकतो. कायदेशीर बाबतीत नवीन वळण येणार आहे, तेव्हा सतर्क राहा. संध्याकाळपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होतील. पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे.

वृषभ: जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांचे काही कारणामुळे भांडण होवू शकते. तुम्ही कोणालाही अपशब्द बोलू नका. तुमच्या कामामुळे आणि त्यातील उत्साह, जोश यामुळे तुम्ही विरोधांवर मात करणार आहात. घरगुती वापरासाठी वस्तूंची खरेदी होणार आहे, तेव्हा खर्च वाढेल. धार्मिक कार्यात खर्च केल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे तुमचं मन आनंदित होईल.

मिथुन: आजचा दिवस फारसा चांगला नाही, तुमचे कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि तुमच्या योजना अर्धवट राहतील. मिथुन राशीचे जे लोक राजकारणाशी संबंधित आहे त्यांना समस्या येणार आहेत. राजकीय कामात अडथळे आल्यामुळे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कामामध्ये योग्य आणि काहीतरी नवीन रणनीती तयार करा तरच कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती फारशी चांगली राहणार नाही. रात्री तुम्ही कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात.

कर्क: आजचा दिवस चांगला असून तुम्हाला प्रत्येक कामात तुम्हाला यश आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे कामात फोकस असेल तसेच, तुम्ही जे काही करायते ठरवले ते यशस्वीरीत्या पूर्ण होणार. चांगल्या कार्यात तुमची रुची कायम राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी प्रगतीचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. मानसिक समाधान मिळेल पण अती कामामुळे थकवा जाणवेल तेव्हा तब्येत सांभाळा.

सिंह: आजचा दिवस चांगला असून, समाजात तुमची चांगली प्रतिमा निर्माण होईल. धनलाभाचे योग आहेत. सध्या ज्या योजनांवर काम करत आहात, त्यात सावधगिरी बाळगा. प्रमोशनची संधी आहे. व्यवसायात उत्तम नफा होईल. तुमचे रखडलले पेमेंट तुम्हाला मिळल्यामुळे तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील. काही लोक तुमच्या कामाला विरोध करतील तरीसुद्धा तुमची कामे पूर्ण होणार आहेत.

कन्या: आजचा दिवस चांगला असून मान सन्मान वाढणार आहे. तुमची जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पूर्ण करणार आहात. व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची जबाबदारी वाढल्यामुळे काही अडचणींची परिस्थिती निर्माण होऊ शकते, पण घाबरू नका आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील. संध्याकाळचा वेळ आनंदात जाईल.

तुळ: जीवनसाथीचं सहकार्य आणि साथ मिळेल, आणि त्यांच्या मदतीने तुम्ही कोणतंही नवीन काम सुरू करू शकता. व्यावसायिक प्रयत्न यशस्वी होतील. तुमची एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे, सावध राहा. आज जे काही काम कराल ते मन लावून करा.

वृश्चिक: आज प्रत्येक कामात लाभ आणि फायदा आहे. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार वाढल्यामुळे तुमचे सहकारी तुमच्याशी तुटक वागतील. तुमच्या प्रमोशनमुळे सहकाऱ्यांचा मूड काहीसा बिघडू शकतो. तुमचा वेळ दुसऱ्यांची कामे करण्यात जाणार आहे. दुसऱ्यांना मदत केल्याने तुम्हाला खूप मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळचा वेळ कुटुंबातील सदस्यांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

धनु: तुमच्या आजूबाजूचे वातावरण काहीसे प्रतिकूल राहील. मात्र, तुम्ही संयमाने आणि गोड वाणीने सगळं काही सांभाळून घ्याल. आर्थिक स्थिती ठिक आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीची मदत केल्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. रात्रीचा वेळ आनंदात जाईल आणि तुमचं मन खूप प्रसन्न असेल.

मकर: आजचा दिवस फायदेशीर असून एखाद्या नवीन डीलमुळे अचानक आर्थिक लाभ होतील. घरात पत्नी किंवा मुलांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तुम्हाला तणाव येऊ शकतो. कोणतंही महत्त्वाचं काम करताना किंवा गाडी चालवताना सावध राहा, तुमच्या टेन्शनचा कामावर परिणाम होणार नाही याकडे लक्ष द्या.मैत्रीत आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका, नाहीतर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. जोखमीच्या कामांपासून दूर राहा

कुंभ: व्यवसायातील तुमच्या योजना यशस्वी होतील. तुम्हाला उत्तम यश मिळणार असून चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकिचा विचार करु शकता. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही टेन्शनमध्ये होता ते काम पूर्ण होईल. वादविवाद झाले तर शांतपणे संवादाने त्यावर तोडगा काढा. रात्रीचा वेळ कुटुंबासोबत आनंदाने जाणार आहे.

मीन: आजचा दिवस आनंदाने भरलेला असून नशिबाची उत्तम साथ मिळेल. ज्यांनी करिअरची नुकतीच सुरूवात केली आहे, ती मंडळी ऑफिसमध्ये स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतील. तुमच्या कामामुळे ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार असून कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा योग आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

18 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

18 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago