आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: राजकीय क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. तुम्ही स्पर्धा परिक्षा दिली असेल किंवा नोकरीनिमित्त मुलाखत दिली असेल तर तुम्हाला नक्की यश मिळेल. थांबलेली कामेही पूर्ण होईल. तब्येतीची काळजी घ्या कारण पचनशक्ती आणि डोळे या संदर्भात आजार डोके वर काढू शकतात. संध्याकाळी प्रियजनांच्या भेटी होतील त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. तुमच्या आहारावर विशेष लक्ष द्या.

वृषभ: आजचा दिवस कुटुंबातील व्यक्तीं सोबत आनंदात जाणार आहे. दुपारी एखादी आनंददायक शुभ बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होणार आहे त्यामुळे खर्चा वाढतील. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढणार आहे.

मिथुन: तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. दिवसभर कामात व्यस्त राहणार असून अनावश्यक खर्च टाळा. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत वाहन वापरताना सावध राहा. जोडीदाराची प्रत्येक कामात मदत मिळेल. व्यवसायात तुम्हाला अनेक संधी मिळतील त्याचा लाभ घ्या.

कर्क: अचानक मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती होऊन तुमची संपत्ती वाढणार आहे तुमच्या व्यवसायिक योजनांना गती मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. भावनांच्या आहारी जावून तुम्ही जर काही निर्णय घेतले असतील त्याचा पश्चातापाच होवू शकतो. संध्याकाळी कुटुंबासोबत देवदर्शनाला जाण्याची शक्यता आहे.

सिंह: आजचा दिवस ठिक आहे. तुम्हाला इतरांची मदत केल्याने समाधान मिळते, आजचा दिवस परोपरकारात जाणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने काही बदल होऊ शकतात, ज्यामुळे सहकाऱ्यांना थोडा त्रास होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या चांगल्या वागणुकीने परिस्थिती सामान्य करण्यात यशस्वी व्हाल. रात्री भावाच्या तब्येतीमुळे थोडा ताणतणाव जाणवेल.

कन्या: जेष्ठ लोकांची सेवा आणि पुण्य कार्यात तुमची धन संपत्ती खर्च होणार आहे. विरोधक आज शांत असतील. तुमच्या कामाची धडाडी आणि एकाग्रता पाहून प्रतिस्पर्धी देखील आर्श्चय चकीत होतील. व्यवसायात लाभ आहे फक्त कामांचे योग्य नियोजन करा म्हणजे लाभ दुप्पट होईल. घरात वातावरण चांगले असेल.

तूळ: आजचा दिवस चांगला आहे. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुमच्या वाणीमधील गोडवा आणि मधुरता तुम्हाला विशेष सन्मान मिळवून देईल. कामाच्या धावपळीमुळे आणि हवामानातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. प्रवास सुखद आणि फायदेशीर असेल. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृश्चिक: आजचा दिवस चांगला असून आर्थिक बाजू मजबूत होईल. तुमची धन – संपत्ती आणि मान-सन्मान वाढेल. तुमची पेंडीग कामे पूर्ण होणार आहेत. प्रियजनांच्या भेटी होतील. रागावर नियंत्रण ठेवा तसेच वाणीवर नियंत्रण ठेवा यामुळे प्रतिकुल परिस्थीती निर्माण होणार नाही. संध्याकाळी प्रियजनांच्या भेटी होतील. रात्री कुटुंबासोबत फिरायला जाण्याची शक्यता आहे.

धनु: आजचा दिवस चांगला आहे. घरगुती वस्तूंवर पैसे खर्च करणार आहात. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. तुमचे सहकारी किंवा नातेवाईकांमुळे तणाव वाढू शकतो. पैशांच्या व्यवहारात काळजी घ्या, पैसे कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. आज सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी खूप चक्कर माराव्या लागणार आहेत. पण काळजी करु नका तुमचे काम यशस्वी होईल. विरोधक त्रास देणार नाहीत.

मकर: आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायिक क्षेत्रात मनासारखा लाभ मिळाल्यामुळे तुम्हाल आनंद होईल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा जास्त मजबूत होईल. व्यवसायात बदल करण्याची तुमची योजना सफल होणार आहे. स्पर्धा परीक्षेत यश आणि कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करणार आहात. तुम्ही तिर्थयात्रेचं आयोजन कराल पण काही कारणांमुळे प्रवास पुढे ढकलावा लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या. वाहनात बिघाड झाल्यामुळे खर्च वाढू शकतो.

कुंभ: आजचा दिवस फारसा ठिक नाही तब्येत अचानक बिघडल्यामुळे धावपळ आणि खर्च होवू शकतात. मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करत असाल तर संपत्तीच्या सर्व कायदेशीर बाजूंवर गंभीरतेने विचार करा. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. नोकरीमध्ये वातावरण ठिक असेल पण तुम्ही कामात फोकस ठेवा. कामे वेळच्या वेळी मार्गी लागवण्याचा प्रयत्न करा.

मीन: आजचा दिवस चांगला आहे. घरात सुखसमाधान असल्यामुळे तुमचा ताण तणाव कमी होणार आहे. प्रवासाचे योग असून त्यामुळे तुम्हाला व्यवसायात लाभ होईल. व्यवसायात आखलेल्या नवीन योजना लाभदायक ठरतील विद्यार्थ्यांची मानसिक आणि बौद्धिक ताणतणावातून सुटका होणार आहे. आई-वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद उपयुक्त ठरणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

17 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

2 दिवस ago