आरोग्य

बळकट हाडांसाठी फक्त दूध पिता त्यात घाला ५ गोष्टी; बॅड कोलेस्टेरॉल घटेल, हृदयही राहील निरोगी

दूध पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. दूध प्यायल्याने गंभीर आजारांचा धोका कमी होतो. कॅल्शियम आणि विविध जीवन सत्त्वेयुक्त दूध फक्त हाडं मजबूत आणि उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर नसून, इतरही अनेक फायदे आहेत. दुधातील पौष्टीक गुणधर्म वाढवण्यासाठी आपण त्यात ६ गोष्टी मिसळू शकता. यामुळे फक्त हाडंच नसून, संपूर्ण आरोग्य सुदृढ राहते.

दुधातील गुणधर्म

दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि निरोगी चरबी यांसारखे आवश्यक बहु-पोषक घटक आढळतात. यामुळे हाडं मजबूत, शिवाय स्नायू बळकट होतात. व्हिटॅमिन डीमुळे मेंदूचे कार्य सुधारते. जर आपल्याला फक्त दूध आवडत नसेल तर, आपण दुधात काही गोष्टी मिसळून पिऊ शकता.

दुधात कोणते पदार्थ घालून प्यायल्याने फायदा होतो

१) हळद: बरेच जण दुधात हळद घालून पितात. याला गोल्डन मिल्कही म्हणतात. हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. शिवाय त्यात दाहक विरोधी गुणधर्म आणि कर्क्यूमिन कंपाऊंड असते. ज्यामुळे संधिवात किंवा हाडांशी संबंधित इतर वेदना कमी होऊ शकतात.

२) आल: दुधात आपण आल्याचा किस किंवा आल्याची पावडर घालू शकता. अपचन, मळमळ, उलट्यांचा त्रास होत असेल तर, दुधात आलं घाला. आल्यामध्ये दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट प्रभाव असतो, ज्यामुळे उलट्या आणि अपचनाचा त्रास कमी होतो.

३) मध: बरेच लोक साखरेऐवजी मध मिसळून दूध पितात. मधात यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. घसादुखी आणि कफ कमी करण्यासाठी मध गुणकारी आहे. जर आपल्याला झोपेची समस्या असेल तर, दुधात मध घालून प्या.

४) दालचिनी: दुधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यात शक्तिशाली अँटि ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जर आपण मधुमेहग्रस्त आहेत, त्यांनी दुधात दालचिनी पावडर घालून अवश्य प्यावे.

५) बदाम: बदामामध्ये फायबर, प्रोटीन, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई इत्यादी पोषक घटक असतात. दुधात बदाम पावडर घालून प्यायल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. आणि हृदय निरोगी राहते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

19 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

20 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago