धावपळीच्या जीवनशैलीमुळे कामाचा वाढता ताण, झोपेची कमतरता आणि बाहेरच्या जंकफूडमुळे आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.(Bp Problem) इतकेच नाही तर आपण वारंवार चहा आणि कॅफीन प्यायल्याने आपले आरोग्य धोक्यात येते. पुरेशी झोप आणि मानसिक ताण कमी न केल्याने आपल्या शरीरासह मनावर अधिक ताण येतो. पुरेशी झोप न घेतल्याने रक्तदाब वाढतो. आणि हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो.
उच्च रक्तदाब वाढल्यावर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतो. ज्यामुळे म्हातारपणी डिमेंशियाचा धोका देखील वाढतो. पाच महिलांपैकी जवळजवळ एका महिलेला उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजाराने ग्रासले आहे.रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला पुरेसा आहार आणि योग्य व्यायाम करायला हवा. तसेच दैनंदिन दिनचर्येत काही सवयींचा अवलंब करावा. ज्यामुळे या आजारापासून आपले संरक्षण होईल.
आठवड्याभरात किती तास व्यायाम केल्यास रक्तदाब नियंत्रणात होईल.
वाढत्या वयानुसार उच्च रक्तदाबाचा धोका कमी करायचा असेल तर आपल्याला काही सवयींमध्ये बदल करायला हवा. निरोगी खाण्यासोबतच आपल्याला नियमितपणे व्यायाम करायला हवा. यामुळे इतर आजारांचा धोका कमी होईल. तज्ज्ञांच्या मते जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या प्रौढत्वाच्या सुरुवातीच्या काळात आठवड्यातून किमान पाच तास हलका व्यायाम केला तर उच्च रक्तदाबाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
आठवड्यातून सुमारे ५ तास व्यायाम, ज्यामध्ये आपण काही एरोबिक प्रकारांचा समावेश करु शकतो. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहिल. व्यायाम केल्यामुळे आपले हृदय मजबूत होते. ज्यामुळे हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होतो. रक्तवाहिन्यांना पुरेशा प्रमाणात रक्त मिळाले नाही की, रक्तदाब कमी जास्त होतो. नियमित व्यायाम देखील वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब वाढतो. त्यासाठी वजन देखील नियंत्रणात असणे गरजेचे आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…