खडीसाखर औषधी गुणाची आणि उपयोगी आहे. खडीसाखर आणि लवंग चघळत राहिल्याने खोकला कमी होतो. उसाच्या रसावर अग्निसंस्कार करुन खडीसाखर बनवली जाते. ती खाल्ल्यावर लगेच पचते, रक्तामध्ये खडीसाखर शोषली जाऊन तिचा साठा यकृतात केला जातो आणि गरजेनुसार ती शरीरात वापरली जाते.
१) खडीसाखर गोड, वीर्यवर्धक, थंड, पौष्टिक, डोळ्यांना हितकारक, जुलाबावर गुणकारी, हलकी, बलकारक आणि उलटीवर उपयुक्त आहे. सीतोपलादी चूर्ण अर्धा चमचा मधासह चाटवल्याने सर्दी, पडसे, अंगदुखी, ताप कमी होतो.
२) चरक, सुश्रुत या आयुर्वेद ग्रंथकारांनी खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी आहे, असे प्रतिपादन केलेले आहे.
३) खडीसाखर पाण्यात मिसळून घेतली असता तहान भागते. खडीसाखर आणि तूप मिसळलेले दूध प्याले असता दाह, मूत्ररोग आदि विकार बरे होतात.
४) खडीसाखर १ भाग आणि धने ३ भाग एकत्र करून ते उकळत्या पाण्यात तासभर तसेच ठेवावे त्यानंतर कापडाने गाळून बाटलीत भरुन ठेवावे. त्याचे २/२ थेंब सकाळ/संध्याकाळ डोळ्यात टाकल्यास डोळे दुखायचे थांबतात. डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.
५) सर्दी-पडसे यावरील आयुर्वेदीय औषध सीतोपलादी चूर्ण हे खडीसाखरेपासून बनवतात. खडीसाखरेलाच ‘सीतोपला’ म्हणतात. त्या चूर्णात खडीसाखर अधिक असल्याने चूर्णाला सीतोपलादी चूर्ण म्हणतात.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…