शिरूर तालुका

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित निलेश खाबिया व अनिल बांडे यांचा सत्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) जागतिक रक्त संक्रमणामध्ये रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे. रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने (१४ जुन) रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करण्यात आला.

द्रव्यदानं परम दानम्

अन्नदानं ततोधिकम्

ततः श्रेष्ठ रक्तदानम्

या चरकांच्या शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे. रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करुन दुसर्‍याचा जीव वाचवु शकते. शिरुर शहरात सर्वात जास्त वेळा ज्यांनी रक्तदान केले. त्यांचा रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने श्रीफळ ,गुलाब पुष्प व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

 

यावेळी शिरुर शहरातील निलेश खाबिया यांनी ६८ वेळा, त्यांच्या पत्नी वैशाली खाबिया यांनी १५ वेळा, मीत खाबिया १० वेळा आणि अनिल बांडे यांनी ६२ वेळा रक्तदान केल्याने त्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ‘आम्हा सर्वांना रक्तदानाचे शतक करावयाचे असल्याचे’ निलेश खाबिया यांनी यावेळी सांगितले. तसेच रक्तदानाची शंभरी पुर्ण करण्याचाही संकल्प केला असल्याचे यावेळी खाबिया म्हणाले.

 

१४ जुन हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणुन साजरा केला जातो . जे लोक स्वतःच्या इच्छेने रक्तदान करुन दुसऱ्याला जीवनदान देतात. त्यांचे आभार मानणे आणि नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे असे या दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. रक्तदान केल्यास आपणास काहीही त्रास होत नाही. हे सांगणेही आवश्यक आहे. सुरक्षित रक्त रुग्णाला मिळवून देण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते आहे.

 

काही वर्षांपुर्वी कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना तसेच आजकाल धकाधकीच्या जीवनात बर्‍याच वेळा छोट्या-मोठया अपघातात, ऑपरेशनच्या वेळी, रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे. आणि तो आपण करु शकतो.

 

मी स्वतः आजपर्यंत १३ वेळा रक्तदान केले आहे. तसेच यापुढेही नेहमी रक्तदान करत रहाणार असुन त्यामुळे आजच्या दिवशी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यांनी मी रक्तदान करेन असा संकल्प करावा असे आवाहन रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले.

 

यावेळी डॉ स्मिता कवाद, गीता आढाव, अनुपमा दोषी, शितल शर्मा व मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या वतीने राणी कर्डिले यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 मिनिटे ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

14 मिनिटे ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

23 मिनिटे ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

3 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

4 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

4 तास ago