आरोग्य

रोजच्या आहारात आवळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आवळा औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आवळा अनेक औषधांमध्ये वापरला जातो. आवळ्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहेत.

त्यात व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर असतात. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नसारखे मिनरल्स असतात, जे अनेक रोगांवर फायदेशीर असतात. जर तुम्ही रोजच्या आहारात आवळ्याचा समावेश केला तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि इंफेक्शनसारख्या समस्यांमध्ये आवळा फायदेशीर ठरतो.

आवळा खाण्याचे फायदे

पचन समस्या:- आवळ्याचा आहारात समावेश केल्यास पचनाच्या समस्या दूर होतात. पचन, बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसची समस्या आवळ्याच्या सेवनाने दूर होते. जर तुम्हाला अन्न पचनास त्रास होत असेल, आतड्याची हालचाल नीट होत नसेल तर आवळ्यानं बनवलेल्या गोष्टींचा तुमच्या आहारात समावेश करा.

प्रतिकारशक्ती वाढवणे:- आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी आहे. आवळ्यापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. आजारांच्या हंगामात आवळ्याचा आहारात समावेश केल्यास सर्दी सारखे संसर्ग होत नाहीत.

हाडे मजबूत होतात:- आवळा हाडांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. आवळ्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते ज्याचा उपयोग हाडे मजबूत करण्यासाठी होतो. आवळा खाल्ल्यानं ऑस्टिओपोरोसिस, संधिवात आणि सांधेदुखी यांसारख्या हाडांशी संबंधित समस्यांमध्ये त्रास कमी होतो. हाडांचे दुखणे दूर करण्यासाठी आवळ्याचा ज्युस हा रोज सकाळी घ्या.

हृदयासाठी फायदेशीर:- आवळा हृदयाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आवळ्यातील क्रोमियम बीटा हृदयाच्या मज्जातंतूंना ब्लॉकेजपासून वाचवते, ज्यामुळे हृदय चांगले कार्य करते आणि निरोगी राहते.

डोळ्यासाठी फायदेशीर:- आवळा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आपली नजर चांगली करण्यास मदत करते. आवळ्यापासून बनवलेला मुरंबा, चटणी यासारख्या गोष्टी खाल्ल्यानं चवीसोबतच दृष्टीही वाढते.

मधुमेह:- आवळ्यामध्ये असलेले पोषक तत्व मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

संसर्ग होण्यापासून होतो बचाव:- आवळ्यामध्ये असलेले पोषक घटक संसर्ग दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. आवळा बॅक्टेरियाशी लढण्याचे काम करतो. हे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. याच्या सेवनाने सर्दी आणि पोटाच्या संसर्गापासून मुक्ती मिळते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

7 तास ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

9 तास ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

2 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

2 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

3 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

3 दिवस ago