आरोग्य

देशी तुपाचे आरोगयदायी- फायदे…

वजन कमी करण्यासाठी अनेक जण डायटिंग सुरू केल्यानंतर सर्वात पहिले तुप खाणे बंद करतात. या पाठीमागचे त्यांचे कारण तुप खाल्ल्यामुळे वजन वाढते. पण तसे बिलकूल नाही. देशी तुपामुळे आपला मेंदू आणि शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होते. काही आजारांमध्ये डॉक्टरांतर्फे तुप खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हा सल्ला सर्वच रुग्णांना देण्यात येत नाही. आज तुम्हाला देशी तुप खाल्ल्यामुळे काय फायदे होतात हे सांगणार आहोत.

देशी तुपाचे आरोगयदायी- फायदे…

देशी तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी ऍसिड असते त्यामुळे हे पचण्यास एकदम हलके असते.

यामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम या सारखे अनेक पोषक तत्व देखील उपलब्ध असतात.

देशी तुप खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

देशी तुपाने डोक्याची मालिश केल्यामुळे केस लवकर पांढरे होत नाही तसेच त्वचेमध्ये चमक येण्यास मदत होते.

रोज शुद्ध तुप खाल्ल्याने वात आणि पित्त शांत राहण्यास मदत होते.

शुद्ध तुप खाण्याने पचन क्रिया उत्तम राहते.

मुलांच्या जन्मानंतर शरीरातील वात वाढ होते. त्यासाठी शुद्ध तुप खाल्ले पाहिजे.

हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास तुप लुब्रिकेंटचे काम करते.

गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदशीर आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पित्त वाढते ते कमी करण्यासाठी तुपाचे सेवन करावे.

डाळी शिजवतांना तुप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.

तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त…

शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट जातात आणि त्वचा मॉयश्चराइज होते.

स्किन नरिश करण्याबरोबर त्वचेतील ड्रायनेस कमी करण्यास मदत होते. शुद्ध तुपाने चेह-याचे मसाज करणे उत्तम असते.

केस चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी डोक्याला शुद्ध तुपाने मालिश करावी. यामुळे केस काळे, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.

भाजलेल्या अथवा शरीरावरील जखमेची खुण कमी करते.

हृदयासाठी…

शुद्ध तुपाच्या सेवनामुळे बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल नियंत्रणात राहते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

शुद्ध तुपामध्ये व्हिटॅमिन के2 असते. यामुळे ब्लड सेलमध्ये जमलेले कॅल्शियम नष्ट करण्याचे काम करते. यामुळे ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते.

शुद्ध तुपाच्या सेवनामुळे इम्यून सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते. यामुळे इन्फेक्शनमुळे होणा-या आजारांशी लढण्यास ताकद मिळते.

शुद्ध तुपामध्ये सूक्ष्म जीवाणु, ऍन्टी-कॅंन्सर आणि ऍंटी-व्हायरल एजेंट उपलब्ध असते. यामुळे अनेक आजारांशी लढा देण्यास मदत होते.

डायजेस्टिव्ह सिस्टीम उत्तम करण्यास मदत करते.

शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरात जमा फॅट पातळ करून त्याचे व्हिटॅमिनमध्ये रूपांतरण करण्याचे काम करते.

यामुळे खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते आणि मेटाबॉल्जिम उत्तम राहण्यास मदत होते.

आहारामध्ये शुद्ध तुप एकत्र करून खाण्याने खाल्लेले अन्न लवकर डायजेस्ट होते.

अल्सर, गॅस आणि पचन क्रियेमध्ये असलेल्या अडचणी यामुळे कमी होण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यासाठी…

शुद्ध तुपामध्ये सीएलए (CLA) उपलब्ध असते. ज्यामुळे मेटाबॉल्जिम उत्तम राहते व वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

सीएलए इंसुलिनची मात्रा कमी ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे वजन वाढणे आणि साखर वाढण्याचा धोका कमी होतो.

शुद्ध तुपाच्या सेवनामुळे शरीरामध्ये अतिरिक्त फॅट तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

हाडांसाठी लुब्रिकेंट म्हणून काम करते, गुडघेदुखी साठी उपयुक्त.

तुप दिवसभरात दोन चमचे खावे. भात, भाजी, आमटी यावर घेतले तरी चालते.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

9 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago