cockroach
पाऊस आला की वेगवेगळे आजार डोकं वर काढतात. या दिवसात डासही खूप वाढतात. सोबतच झुरळ आणि माश्याही वाढतात. ज्यामुळे वेगवेगळे आजारही होतात. अशात माश्या किंवा झुरळ किंवा डास बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. घरातील झुरळ बाहेर काढण्यासाठी काही उपाय पुढीलप्रमाणे…
घरातील झुरळ पळवून लावण्यासाठी बाजारातील वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो. पण याचा तुमच्याही आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. खासकरुन घरात जेव्हा लहान मुलं असतात. अशावेळी आम्ही तुमच्यासाठी काही खास घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.
1) तेजपत्ते
तेजपत्ताच्या सुगंधाने झुरळं बाहेर पळतात. घरातील ज्या कोपऱ्यात झुरळ अधिक प्रमाणात असतात त्याठिकाणी तेजपत्त्याची काही पाने बारीक करुन ठेवा. तेजपत्ते बारीक केल्यावर तुमच्या हाताला तेल लागल्याचे दिसेल. याच तेलाचा सुगंध झुरळांना पळवून लावतो. ही पाने काही दिवसांनी बदलत रहावी.
2) बेकिंग पावडर आणि साखर
एका वाटिमध्ये समान प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर मिश्रित करा. साखरेचा गोडव्याकडे झुरळं आकर्षित होतात. आणि बेकिंग सोड्यामुळे ते मारले जातात.
3) लवंग
झूरळाला घरातून पळवून लावण्यासाठी लवंगचा फार फायदा होतो. ज्या ज्या जागांवर झुरळं येतात त्या ठिकाणी काही लवंग ठेवाव्यात. लवंगेच्या उग्र दर्पामुळे झुरळं घरातून पळतात.
4) बोरिक पावडर
बोरिक पावडर घरातील काही जागांवर टाकल्यास झुरळं घरातून पळ काढतात. पण हे पावडर टाकताना काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील लहान मुलांना या पावडरपासून दूर ठेवा.
5) केरोसिन
केरोसिनचा वापर करुनही घरातील झुरळं पळवून लावता येतात. पण याच्या वासाने तुम्हालाही त्रास होऊ शकतो.
आणखी काही टिप्स:
1) पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जागांवर जाळी लावावी.
2) फळ किंवा भाज्याच्या साली जास्त वेळ घरात ठेवू नका.
3) घरात अन्न सांडू नये याची काळजी घ्या.
4) घरातील अन्न छाकून ठेवा.
दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…
मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…
कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…
डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…
मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे
साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे
पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…
‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली काँग्रेसकडून लोकशाहीबाबत संभ्रम; व्होट चोरीच्या आरोपांवर पुरावे देण्याचे शिंदेंचे आव्हान ठाणे :…
नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही; १०० बेडचे रुग्णालय २०० बेडचे करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना…
रिक्षाचालक ते उपमुख्यमंत्री; संघर्ष, संघटनकौशल्य, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास मुंबई: नेतृत्व हे केवळ…
एक आरोपी हरियाणातून, तर दुसरा विश्रांतवाडीतून जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर…
सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…
कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…