शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील आनंद नागरी पतसंस्थेत तब्बल १७ कोटींचा अपहार; गुन्हे दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील नामांकीत असणाऱ्या आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत तेथील संचालक मंडळ व लेखा परीक्षकांनी संगनमताने तब्बल सतरा कोटी रुपयांचा अपहार करुण ठेवीदारांची मोठी आर्थिक फसवणुक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये पतसंस्थेच्या संचालक मंडळासह चौदा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिरूर येथील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदार पैसे ठेव म्हणून ठेवत असताना पतसंस्थेचे अध्यक्ष अभयकुमार चोरडिया यांसह संचालक मंडळाने पतसंस्थेतील तब्बल १६ कोटी ७० लाख ५४ हजार रुपये आपल्याच नात्यातील लोकांना विनातारण कर्ज वाटप केले आहे. त्यांनतर सदर कर्जाची वसुली न करता बँकेचा तोटा असल्याचे दाखवले, दरम्यान सदर पतसंस्थेचे तत्कालीन लेखा परीक्षक यांना याबाबतची सर्व माहिती असताना देखील या बाबी वरिष्ठ कार्यालयांना कळवल्या नाही. संचालक मंडळाला साथ देऊन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे सहकारी संस्था पुणे व द्वितीय अप्पर विशेष लेखा परीक्षक संजयकुमार सखाराम मुंडे (वय ५६, रा. लेअर टाऊन अमेनोरा मागे हडपसर पुणे) यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभयकुमार पोपटलाल चोरडीया, संचालक प्रवीण चंपालाल चोरडीया, सनीधरमचंद चौरडीया, सविता अभयकुमार चोरडीया, सुजाता नितीन चोरडीया, प्रीतम प्रवीण चोरडीया, पारसबाई पोपटलाल चोरडीया, चंपालाल बुधमल चोरडीया, सुरेंद्रकुमार रतनलाल चोरडीया (सर्व रा. आनंद सोसायटी शिरूर ता. शिरूर जि. पुणे) मुरसलीन वाहिद मोहम्मद (रा. सफरपूर राजपुतान ता. रूड जि. हरिद्वार राज्य उत्तराखंड) आनंद नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक शांताराम गंगाधर देवकर (रा. तीनचारी वस्ती कोल्हार बुद्रुक ता. राहता जि. अहमदनगर), सनदी लेखा परीक्षक सरिता ब्रिजमोहन सिंह (रा. व्सिहाल रेसिडेन्सी कासारवाडी पुणे), नागेंद्र एच सोरटे, अजय एच सोरटे दोघे रा. दापोडी पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लतीफ मुजावर हे करत आहे.

दरम्यान, एवढया मोठ्या प्रमाणावर ठेवीदारांची फसवणुक केल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहे. ठेवीदारांनी पंतसंस्थेत गुंतवणुक करताना चौकशी करणे गरजेचे आहे. शिरूर तालुक्यातील अनेक पंतसंस्था डबघाईस आल्या असून गुंतवणुकदारांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

शिक्षकांच्या बदलीसाठी चक्क शाळा भरवली शिरूर पंचायत समितीत…

शिरुर तालुक्यात बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; अधिकारी वसुलीत मग्न…

मारहाण करणाऱ्या निलंबित शिक्षकांची मुजोरी, प्रशासनालाही जुमानेना, शाळेवर करतायेत नियमित कामकाज

राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या दाजीच्या शेतमालाला आणि दुधाला बाजारभाव द्यावा; डॉ अमोल कोल्हे

खळबळजनक! शिरूर तालुक्यात करंट देऊन पत्नीचा केला खून; कारण…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago