शिरूर तालुका

शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पाबळफाटा ते मोती नाला राज्य मार्ग १०३ या रस्त्याचे काम सुरु असुन ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असुन या कामाच्या साईडपट्ट्या भरण्यासाठी मुरुमाऐवजी मातीचा वापर होत आहे. शिरुरचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय हे दोन किलोमीटरच्या अंतरावर असुनही तेथील आधिकाऱ्यांना या रस्त्याचे काम पाहायला वेळ नाही का…? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडुन उपस्थित केला जात आहे. या रोडच्या साईट पट्टीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. या सर्व दर्जाहीन काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवरती संबंधित अधिकारी कारवाई करणार का…? याबद्दल नागरिकांमधून चर्चा सुरु आहेत.

 

सध्या रोडच्या साईट पट्ट्याचे काम सुरु आहे. साईट पट्ट्यावरती मुरुम टाकण्याऐवजी माती साईट पट्ट्यांवरती टाकत आहे. या साईट पट्ट्यावरती टाकलेल्या मातीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही माती दुसऱ्या मोठ्या वाहनाच्या टायरच्या साह्याने व पावसाने डांबरी वरती आल्यास दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात होऊ शकतात. या कामाबाबत स्थानिक नागरीकांनी, वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली असून या ठेकेदारावर कारवाई करून माती ऐवजी मुरुम टाकण्याची मागणी केली जात आहे.

शिरुर तालुक्यात बोगस बियाण्याने शेतकरी हतबल; अधिकारी वसुलीत मग्न

शिरुर तालुक्यातील एका शासकीय पाझर तलावाला लागली भुक;हजारो ब्रास गौण खनिज केले गिळंकृत

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

6 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

6 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

21 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago