आरोग्य

केवळ उष्णता किंवा कमी पाणी नाही तोंडात फोड येण्याची कारण

तोंडात अल्सर होणं म्हणजेच फोड एक कॉमन समस्या असली तरी खूप त्रासदायक असते. तोंडात फोड आला तर काही खायला आणि प्यायला इतकंच काय तर बोलायला सुद्धा अडचण होते. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, पाणी कमी प्यायल्यामुळे किंवा उष्णतेमुळे तोंडात फोड होतो. पण मुळात याची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यांकडे दुर्लक्ष करणं समस्या वाढवणारं ठरू शकतं. अशात तोंडात फोड येण्याची ५ वेगवेगळी कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य तो उपाय करू शकाल.

तोंडात फोड येण्याची कारण

१) जर तुमची पचनक्रिया चांगली नसेल आणि तुम्हाला नेहमीच बद्धकोष्ठतेची म्हणजेच पोट साफ न होण्याची समस्या होत असेल, तर याचा प्रभाव तोंडातही दिसून येतो. पोटात उष्णता आणि अ‍ॅसिडिटी वाढल्यानं तोंडात फोड येऊ शकतो.

२) शरीरात व्हिटामिन बी१२, आयर्न आणि फोलिक अ‍ॅसिड कमी झाल्यावरही तोंडात फोड येतो. जेव्हा हे तत्व कमी होतात तेव्हा तोंडात असह्य वेदना देणारे फोड होतात.

३) महिलांमध्ये सामान्यपणे मासिक पाळीदरम्यान किंवा गर्भवती असताना होणाऱ्या हार्मोन असंतुलनामुळेही तोंडात फोड येऊ शकतात. ही काही दिवसात बरी होणारी समस्या असते, पण जोपर्यंत असते असह्य वेदना देते.

४) जास्त मानसिक तणाव, चिंता आणि कमी झोप याचा थेट प्रभाव शरीराच्या इम्यून सिस्टीमवर पडतो. ज्यामुळे तोंडात फोड येतात.

५) बऱ्याचदा जास्त तिखट, मसालेदार किंवा गरम काही खाल्ल्यानं तोंडातील त्वचा भाजते, त्वचेवर फोड किंवा जखम होते.

काय कराल उपाय

दही नियमित खा, ताक प्या आणि नारळाचं पाणी सुद्धा प्या. यानं ही समस्या दूर होऊ शकेल.

तोंडात फोड झाला असेल तर तुळशीची पानं किंवा ज्येष्ठमध चावून खा. यानं नॅचरल थंडावा मिळेल.

बेकिंग सोड्यात थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करा आणि ती तोंडातील फोडावर लावा. यानंही आराम मिळेल.

दिवसभर भरपूर म्हणजे २ ते ३ लीटर पाणी प्या. तसेच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

8 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago