महाराष्ट्र

लिंगसमभाव हा केवळ सामाजिक विचार नसून सुप्रशासनाची गरज; डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी साधनसामग्री, तंत्रज्ञान व निधीची गरज – आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये प्रतिपादन

मुंबई: शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) साध्य करण्यासाठी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरेसा निधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचा सूर आज येथे आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये उमटला. विधान परिषद उपसभापती कार्यालय आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांवरील हिंसाचाराचे उच्चाटन: सक्षमीकरणाचे मार्ग” या विषयावर हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता.या वेबिनारमध्ये देश-विदेशातील कायदेतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांवरील हिंसाचाराच्या विविध प्रकारांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक कायदे सुधारणा आणि न्यायव्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातील कार्यप्रणालीसाठी लहान आणि व्यापक स्तरावर न्याय व विकास यंत्रणा मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

खासदार डॉ. डी. पुरंदेश्वरी यांनी महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी प्रभावी अर्थसंकल्पीय नियोजन आणि ‘निर्भया’ योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर दिला. ओडिसा विधानसभा अध्यक्षा सुरमा पाधी यांनी महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि संरक्षणाच्या हक्कांना बळकट करण्यासाठी कायद्याची भूमिका स्पष्ट केली.

ज्येष्ठ विदुषी डॉ. पॅम राजपूत यांनी ‘CEDAW’ कराराच्या माध्यमातून पीडित महिलांना न्याय देण्यासाठी भेदभावमुक्त प्रणाली विकसित करण्याची गरज व्यक्त केली. लंडनस्थित रेणुका फडके यांनी आर्थिक साक्षरता आणि सुरक्षित सामुदायिक जागांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा जागतिक दृष्टिकोन मांडला.

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी भारतात असलेल्या विविध कायद्यांची माहिती घेऊन महिलांनी आपले हक्क जपावेत आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन केले.

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस आणि शासकीय यंत्रणांना लिंगाधारित हिंसाचार व मानवी हक्कांबाबत प्रशिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांनी लिंगसमभाव, विविधता आणि महिलांच्या ओळखीचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.

पुण्यातील क्षेत्रीय कार्यकर्त्या अंजू वाघमारे आणि लहानु आबनावे यांनी ग्रामीण भागातील कामाचे अनुभव मांडले.कार्यक्रमाची सुरुवात अपर्णा पाठक यांनी केली, तर आभार प्रदर्शन मुग्धा केसकर यांनी केले.या परिषदेत महिलांना केवळ लाभार्थी म्हणून न पाहता विकास प्रक्रियेत नेतृत्व देणारी शक्ती म्हणून पाहणे आवश्यक असल्याचा सर्वसंमत निष्कर्ष नोंदवण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

13 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

20 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

20 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

2 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

3 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

3 दिवस ago