आरोग्य

कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी किती फायद्याचे

बरेच आयुर्वेदिक उपाय आपण करत असतो.असं म्हणतात औषध जेवढं कडू तेवढंच गुणकारी असत. बरेच घरगुती उपाय आपण करत असतो. विविध औषधे आपण वापरतो. मात्र नैसर्गिक उपचार सर्वांत जास्त फायदेशीर ठरतात. मुख्य म्हणजे अशा उपायांचे शक्यतो दुष्परिणाम होत नाहीत. कडुलिंबाचा पाला सगळीकडे उपलब्ध असतो. मात्र तो वैद्यकीयदृष्ट्या प्रचंड समृद्ध आहे हे आपल्याला माहिती नसते. कडुलिंबाचा रस कडु असल्याने आपण तो पिण्यासाठी नाक मुरडतो. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? शरीरासाठी कडुलिंबाचा पाला फारच उपयोगी ठरतो. रोगराईसुद्धा पाल्यामुळे शरीरातुन नाक मुरडत निघून जाते.

शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कडुलिंबाची पाने फार फायदेशीर ठरतात. कडुलिंबात अनेक जीवनसत्वे व खनिजे असतात. यकृताचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी कडुलिंब मदत करते. त्याचप्रमाणे या पाल्याची रक्तशुद्धीकरणास मदत होते. सर्दी खोकल्याच्या संसर्गांपासूनदेखील हा पाला शरीराला वाचवतो. कडुलिंबाची पाने कर्करोग होण्याचा धोका कमी करतात. बरेच जण वजन कमी करण्यासाठी देखील या पानांचे सेवन करतात. दातांच्या, हिरड्यांच्या मजबुतीसाठी हा पाला उपयुक्त आहे. कडुलिंबाच्या पाल्यात फॅटी अॅसिड असते.जे केसांच्या मजबुतीसाठी व वाढीसाठी उपयुक्त असते. यात अँटीऑक्सिडंट असतात.रोगप्रतिकारकशक्ति वाढवण्यासाठी ते उपयुक्त असतात. पाल्याचा रस केसांना लाऊन नाहणेसुद्धा फायदेशीर ठरते.

त्याचप्रमाणे पाल्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्त्चचादेखील छान राहते. मुरूम, सुरकुत्या चेहऱ्यावरील डाग कमी होतात. खास करुन रिकाम्या पोटी कडुलिंबाचा पाला सेवन करावा, आतड्यांसाठी ते जास्त फायदेशीर ठरते.रक्तातील साखर वाढणे हे शारीरिकदृष्या एक वाईट लक्षण आहे.ही साखर आटोक्यात ठेवण्यासाठी कडुलिंबाचा पाला गुणकारी ठरतो. या पाल्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते पोट साफ होण्यास मदत करते आणि पोट फुगणे थांबवते.या पाल्याचा रस विविध प्रकारे सेवन करता येतो.हळद आणि पाला एकत्र खाल्यास आणखी फायदेशीर ठरते. पाल्याची पेस्ट करुन, पाला पाण्यात उकळवून, त्याचा रस काढून, पाने भाजून, आदी. वेगवेगळ्या प्रकारे पाला सेवन करता येऊ शकतो. मात्र कडुलिंबाची ताजी पाने रिकाम्या पोटी चावून खाणे जास्त फायदेशीर ठरते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago