आरोग्य

निलगिरी तेल कसे फायदेशीर

इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी ‘निलगिरीचे तेल’ नक्की वापरा.

कसे आहे तेल फायदेशीर

निलगिरीच्या तेलामध्ये अ‍ॅन्टीसेप्टीक तसेच अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. इंन्फेक्शन वाढवणार्‍या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी निलगिरीचे तेल उपयुक्त ठरते. तसेच वेदना कमी करण्यासही मदत होते. सोबतच सर्दी-पडशाचा त्रास, श्वसनाच्या विकारांपासून आराम मिळतो. नाक चोंदल्याने होणारी कानदुखी कमी करण्यासही निलगिरीचे तेल फायदेशीर ठरते.

मग कसे वापराल निलगिरीचे तेल

मसाज: कानाच्या बाहेरील भागावर निलगिरीच्या तेलाने मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. तसेच वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच कानात साचलेला मळ मोकळा होण्यासही मदत होते. मात्र त्यासोबत खोबरेल तेल मिसळून मानेकडे खालच्या बाजूला मसाज करा.

वाफ घेणे: सर्दीमुळे किंवा नाक चोंदल्याने कान दुखत असल्यास वाफ घेणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी गरम पाण्यात 4-5 निलगिरीच्या तेलाचे थेंब टाका. डोकं जाड चादरीने किंवा टॉवेलने झाका. हळूहळू श्वास घ्या. श्वास घेताना नाक मोकळे होईल. परिणामी कानदुखीचा त्रासही कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

12 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

13 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

13 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

13 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

14 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

14 तास ago